Viral Video: सोशल मीडियामुळे कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. ज्यावर कधी डान्सचे व्हिडीओ तर कधी प्राण्यांचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. बऱ्याचदा सोशल मीडियावर श्वानांचे व्हिडीओदेखील पाहायला मिळतात, ज्यात कधी रस्त्यावरील श्वान अनोळखी व्यक्तींचा पाठलाग करताना दिसतात, तर श्वानांमुळे अपघातही झालेले पाहायला मिळतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक भटका श्वान असंच काहीतरी करतोय, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आजपर्यंत तुम्ही अनेक व्यक्तींना रस्त्यावर चालू असलेली भांडणं सोडवताना पाहिलं असेल, श्वानदेखील बऱ्याचदा रस्त्यावर एकमेकांबरोबर भांडताना दिसतात. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील एक श्वानदेखील असंच काहीतरी करतोय, जे पाहून तुम्हीही अवाक व्हाल. भर रस्त्यात दोन गायींची झुंज (Two cows started fighting on the road ) या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भररस्त्यात दोन गायी एकमेकींबरोबर भांडण करताना दिसत आहेत. यावेळी एक श्वान तिथे येतो आणि त्या दोन्ही गायींना थांबवण्याचा प्रयत्न करतो. तरीही त्या दोन्ही गायी थांबत नाहीत. पण, यावेळी श्वानदेखील मागे न हटता त्यांच्यामध्ये पुन्हा पडतो. शेवटी श्वानाचे प्रयत्न कामी येतात आणि त्या दोन्ही गायी त्यांचे भांडण थांबवतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @confused.aatma अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत पाच मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून, छत्तीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. हेही वाचा: अरे देवा! फ्रिजमध्ये लपून चिमुकली खातेय खाऊ; Viral Video पाहून तुम्हीही माराल कपाळावर हात पाहा व्हिडीओ (See Video) युजर्सच्या कमेंट्स चर्चेत (Viral Video Comments) एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, "या कुत्र्याला एक पुरस्कार द्या", तर दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, "किती हुशार कुत्रा आहे खूप मोठ्ठ संकट आलं असतं", तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, "याचा सत्कार करा", तर चौथ्या युजरने लिहिलंय की, "शेरु खूप हुशार आहे"