Viral Video: समाजमाध्यमांवर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण विविध गाण्यांवर डान्स करून आपली कला सादर करतात. हल्ली सोशल मीडियावर कोळी गीतदेखील खूप चर्चेत येऊ लागली आहेत. सध्या अशाच एका कोळीगातावरील एक डान्स खूप व्हायरल होतोय. यामध्ये दोन तरूणी सुंदर डान्स करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल, हे सांगता येत नाही. या चर्चेत असलेल्या गाण्यांवर प्रत्येक वयोगटातील लोक, मोठमोठे कलाकारही ठेका धरताना दिसतात. हल्ली कधी ‘स्वप्नात आली राणी मुखर्जी’, हे गाणं तर कधी ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ ही गाणी खूप चर्चेत आहेत, ज्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत. आताही असाच एक नव्या कोळी गाण्यावरील व्हिडीओ व्हायरल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरूणी समुद्र किनारी सुंदर पारंपारिक वेश करून ‘आम्ही बाय जातीच्या कोळीनी…’ या कोळी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्सही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @step_art_entertainment या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत तीन लाखाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “खूप सुंदर डान्स” आणखी एकाने लिहिलेय, “मस्त” आणखी एकाने लिहिलेय, “एक नंबर केलं दोघींनी”