Viral Video: सोशल मीडिया हे सध्या केवळ मनोरंजनाचे माध्यम राहिलेले नाही, तर अनेकांसाठी कमाईचे साधनही बनले आहे. डान्स, कॉमेडी, फूड, ट्रॅव्हल किंवा माहितीपर व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाल्यास क्रिएटर्सना जाहिराती, ब्रँड प्रमोशन आणि विविध माध्यमांतून उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे आपल्या कौशल्याला सोशल मीडियाची जोड देत अनेकजण लोकप्रियतेसोबतच आर्थिक कमाईही करताना दिसतात.
सोशल मीडिया आणि डान्स व्हिडीओ यांचं समीकरण सध्या चांगलंच लोकप्रिय झालं आहे. ट्रेंडिंग गाणं, आकर्षक डान्स स्टेप्स आणि हटके लोकेशन यांचा मेळ साधत अनेक जण रील्स तयार करताना दिसतात. काही सेकंदांचा हा व्हिडीओ आवडला तर यूजर्स तो लाईक, शेअर आणि कमेंट करत असल्याने पाहता-पाहता तो सोशल मीडियावर व्हायरल होतो. त्यामुळे डान्स ही केवळ कला किंवा मनोरंजन न राहता सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवण्याचं प्रभावी माध्यम बनलं आहे.
लता मंगेशकरांची हिंदी गाणी आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात. दशकं उलटली तरी त्यांच्या मधुर आवाजातील गाण्यांची जादू कायम आहे. आजच्या पिढीलाही त्यांची गाणी आवडतात आणि अनेकजण सोशल मीडियावर या सदाबहार गाण्यांवर रील्स, डान्स व्हिडीओ आणि विविध प्रकारचे कंटेंट तयार करताना दिसतात.
‘अरे रे अरे यह क्या हुआ’ या सदाबहार गाण्यावर दोन तरुणी भररस्त्यात डान्स करताना दिसत आहेत. जुन्या हिंदी गाण्याची मोहक चाल आणि तरुणींच्या उत्साही डान्स स्टेप्सचा सुंदर मेळ या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतो. त्यांच्या डान्सने रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचेही लक्ष वेधून घेतले असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @danceshikhas या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “क्या बात है” एका युजरने लिहिलेय, “सुंदर सादरणीकरण” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूपच गोड”
