Viral Video: हल्लीच्या लहान मुलांमध्येही सोशल मीडियाप्रति खूप आकर्षण असलेले पाहायला मिळते. नवनवीन गाणी, चित्रपट आणि त्यातील डायलॉग्ज मुलांना तोंडपाठ असतात. ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता एका चिमुकलीचा डान्स व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया सध्याच्या घडीचे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मनोरंजन करणारे माध्यम झाले आहे. त्यावर विविध विषयांवरील माहितीपासून ते विविध घटनांचे चांगले-वाईट व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ आपल्या काळजाचा थरकाप उडवतात; तर काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात. परंतु यातील काही मोजके व्हिडीओ खूप चर्चेत येतात. अनेकदा चर्चेत आलेल्या व्हिडीओमधील कलाकरांना यामुळे खूप प्रसिद्धी मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यातील एक चिमुकली तरूणीसह खूप भन्नाट डान्स करताना दिसतेय.

आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण घरबसल्या पैसे कमवत आहेत. काही जण युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर अशा अनेक प्लॅटफॉर्मचा वापर त्यांचे टॅलेंट दाखवण्यासाठी करत आहेत आणि नावासोबत पैसेसुद्धा कमवताना दिसून येत आहेत. व्यापारी असो किंवा एखादा कलाकार, प्रत्येक जण आपल्या कौशल्याचा वापर करून नवनवीन व्हिडीओ पोस्ट करताना दिसून येतात; तर अशातच काही जण असेही असतात, जे परिस्थितीमुळे आपलं टॅलेंट लोकांपर्यंत पोहचवू शकत नाहीत किंवा सोशल मीडियाची मदत घेतात. ज्यामुळे लाखो कलाकारांच्या कलेला आता वाव मिळू लागला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली तरुणीसह प्रियांका चोप्राच्या ‘देसी गर्ल’ या सुप्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यावेळी त्या दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव अन् डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल. त्यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून पसंती दिली जात आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेतही आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरील @barkat.arora या अकाउन्टवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “खूप छान नाचली”. तर दुसऱ्याने लिहिलंय की, “मोठी होऊन आई-वडिलांचे नाव मोठे करणार”. तर तिसऱ्याने लिहिलंय की, “खूपच क्यूट आहे ही”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “दोघीही सुंदर नाचत आहेत”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “याला बोलतात खर एनर्जी”