Viral video: काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. मग स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. पण, व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत; मात्र तरीही तरुणाई यातून काहीही बोध घेत नाही. असाच एका तरुणाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये तरुण धावत्या बाईकवर पाठिमागे चित्र विचित्र स्टंट करताना दिसत आहे. मात्र याचा शेवट इतका भंयकर झालाय की बघूनच अंगावर काटा येतो.

त्यानं भरदाव पळणाऱ्या बाईकवर असे असे स्टंट मारले आहेत की ज्यांची आपण कधी कल्पना सुद्धा करू शकणार नाही. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोक काय करतील याचा नेम नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण धावत्या बाईकवर पाठीमागे बसून उभा राहून स्टंटबाजी करत आहे. कधी हवेत पाव वर करतोय तर कधी एका पायावर उभा राहतो. यावेळी तो आजूबाजूला बघून हसतानाही दिसत आहे मात्र पुढे काय घडणार आहे याची त्याला पुसटशीही कल्पना नाहीये. दरम्यान स्टंटबाजी करताना त्याचा अचानक तोल जातो आणि भर वेगात असणाऱ्या बाईकवरुन तो थेट तोंडावर पडतो. आता ही स्टंटबाजी त्याला चांगलीच महागात पडली आहे. अक्षरश: रस्त्यावर तोफरपटत जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अंदाज येतो की त्याला किती जोरात लागलं असेल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: जबरदस्ती नाच म्हणाल्यामुळे नवरदेवाला आला राग, रागावलेल्या नवऱ्यानं केलं असं काही की…नेमकं काय घडलं?

ज्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलेय की, भाऊ त्याला २१ तोफांची सलामी दिली पाहिजे. आणखी एका युजरने लिहिलेय की, याला म्हणतात मृत्यूशी खेळणं.आणखी एका युजरने लिहिले की, क्षणभर असे वाटेल की, आता संपलं सगळं. दुसऱ्या युजरने लिहिले, ‘खूप धोकादायक व्हिडीओ.’ त्याच वेळी तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘लोकांना त्यांच्या जीवाची पर्वा नाही.’