Viral Video: सोशल मीडियावरील जंगलातील प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. जंगलातील प्राण्यांबाबतीतल्या अनेक गोष्टी पाहण्यासाठी युजर्सही नेहमीच उत्सुक असतात. आतापर्यंत तुम्ही अनेक व्हिडीओंमध्ये वाघ, बिबट्या, सिंह किंवा चित्ता या हिंस्र प्राण्यांना नेहमीच इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिले असेल. प्राण्यांची शिकार करण्यासाठी या हिंस्र प्राण्यांना अनेक प्रयत्न करावे लागतात. अगदी आपली शिकार शोधण्यापासून ते ती शिकार मिळवण्यापर्यंत हे हिंस्र प्राणी खूप मेहनत घेतात. पण, काही प्राणी असेही असतात जे दुसऱ्याने मिळवलेली शिकार आयती मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यात एका हरणाची शिकार करण्यासाठी दोन वाघ प्रयत्न करताना दिसत आहेत.
समाजमाध्यमांवर सतत प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर, तर कधी थरारक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ काही क्षणांत लाखो व्ह्युज मिळवतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे; ज्यात दोन वाघ हरणावर झडप घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये शिकारीच्या शोधात असणाऱ्या वाघाला एक हरिण दिसते. यावेळी वाघ हरणाचा जीव तोडून पाठलाग करतो. हरिणही प्रचंड चपळ असल्यामुळे जीवाच्या आकांताने धावतो, इतक्यात आणखी एक वाघ तिथे येतो आणि हरणाची शिकार करण्याचा प्रयत्न करतो. परंतु व्हिडीओच्या शेवटपर्यंत वाघांच्या हाती हरिण लागत नाही. दरम्यान, हे सर्व दृश्य काही लोक पाहताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ: (Viral Video)
हा व्हिडीओ युट्यूबवरील @TIGER IN INDIA’s WILD या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्यावर आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्युज आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक नेटकरीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “हरणाने पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही” दुसऱ्याने लिहिलेय, “शेवटी हरण वाचले” तिसऱ्याने लिहिलेय, “पुढे काय झालं असेल बिचाऱ्या वाघाचे”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “वाघ भुकेलेला आहे”
