Viral Video: हल्ली आपली कला सादर करण्यासाठी लोक सर्रास सोशल मीडियाचा वापर करतात. डान्स, गाणी, अभिनय, पेंटिंग, रेसिपी, कविता अशा विविध कलाकृती लोक आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून जगासमोर आणतात. त्याचील काही लोकांचे व्हिडीओ जगभरातील कानाकोपऱ्यात पोहोचतात ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी, पैसा मिळतो. सध्या अशाच दोन तरूणींचा डान्स सोशल मीडियावर इतका व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.
सोशल मीडिया म्हणजे सध्याच्या घडीचे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मनोरंजन करणारे माध्यम झाले आहे. त्यावर विविध विषयांवरील माहितीपासून ते विविध घटनांचे चांगले-वाईट व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ आपल्या काळजाचा थरकाप उडवतात; तर काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक तरूणी खूप भन्नाट डान्स करताना दिसतेय.
समाजमाध्यमांमुळे सतत बॉलीवूडमधील नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या दोन तरुणींचा असाच डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात तरुणी खूप सुंदर डान्स करताना दिसत आहेत.
२००२ साली प्रचंड लोकप्रिय झालेल्या ‘दम’ चित्रपटातील ‘बाबूजी जरा धीरे चलो’ हे गाणं आजही तितकेच लोकप्रिय आहे. सार्वजनिक कार्यक्रम असो अनेक तरुणी, महिला या गाण्यावर डान्स करताना दिसतात. आताही दोन तरूणींचा या गाण्यावरील व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरूणी “बाबूजी जरा धीरे चलो” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या डान्स, त्यातील स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर अनेक जण खूप कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
A post shared by D Y N A S T I C M O V E S © (@dynastic_moves_dm_dancestudio)
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dynastic_moves_dm_dancestudio या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “काय खतरनाक नाचला हो.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “एकदम भारी नाचल्या” तर तिसऱ्याने लिहिलेय, “लयभारीच नाचली गं ही” आणखी अनेक युजर्स त्यांच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहेत.
