Viral Video: पावसाळा सुरू झाला आहे. सगळीकडे निसर्गरम्य वातावरणही आहे. अनेकांना पावसाळ्याचा हंगाम आणि त्यात भिजायला खूप आवडते. सोशल मीडियावरही पावसात भिजण्याचा आनंद लुटणाऱ्या अनेकांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच दोन तरुणीचा पावसात नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत लोक स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. त्यामुळे मानसिक ताण, थकवा आणि अस्वस्थता वाढताना दिसते. अशा परिस्थितीत नृत्य म्हणजेच डान्स हा आनंद आणि आरोग्य देणारा एक प्रभावी मार्ग ठरत आहे. मनसोक्त नाचल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच, पण मनावरचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होतो. पूर्वी नृत्य हे केवळ मनोरंजनासाठी किंवा कार्यक्रमांसाठी केले जायचे. मात्र आता अनेकजण डान्सकडे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी, शरीराचा व्यायाम होण्यासाठी शिवाय प्रसिद्धी आणि पैसा कमावण्याच्या दृष्टीकोनातूनही पाहत आहेत.
सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की एखाद्या गाण्यावर डान्स सादर करुन दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. मग कधी घराच्या आजुबाजूच्या मुली किंवा अगदी बहिणी बहिणी एकत्र येऊन काहीतरी भन्नाट सादर करुन जातात. नुकताच सोशल मीडियावर असाच दोन तरुणींच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्या मुली अतिशय भन्नाट अशा डान्स करताना दिसत आहेत.
हल्ली सोशल मीडियामुळे अनेक जुनी गाणी देखील पुन्हा प्रचंड व्हायरल होताना दिसतात. एकदा हे चर्चेत आलं की त्यावर लाखो युजर्स डान्स करताना दिसतात. २००६ मध्ये बॉलिवूडमधील “वॉटर” चित्रपटातील ऐश्वर्या रायच्या “बरसो रे मेघा मेघा” या गाण्याने प्रेक्षकांना भुरळ घातली होती.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भरपावसात रस्त्यावर दोन तरूणी “बरसो रे मेघा मेघा” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी तरूणींच्या या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर अनेक जण खूप कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @motmainna_moni या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास मिलियन्समध्ये व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “पावसात दोन मोरनी” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “नादच खुळा” तर तिसऱ्याने लिहिलेय, “असा डान्स मी कधीच पाहिला नाही” आणखी अनेक युजर्स त्यांच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहेत.
