Viral Video: हल्ली आपली कला सादर करण्यासाठी लोक सर्रास सोशल मीडियाचा वापर करतात. डान्स, गाणी, अभिनय, पेंटिंग, रेसिपी, कविता अशा विविध कलाकृती लोक आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून जगासमोर आणतात. त्यातील काही लोकांचे व्हिडीओ जगभरातील कानाकोपऱ्यात पोहोचतात ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी, पैसा मिळतो. सध्या अशाच एका तरूणीचा डान्स सोशल मीडियावर इतका व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.
सोशल मीडियामुळे विविध विषयांवर आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात कधी सार्वजनिक कार्यक्रमातले, तर कधी लग्नाचे व्हिडीओ, तर कधी नृत्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु, त्यातील काही मोजकेच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आलाय, ज्यात दोन तरुणी मराठमोळ्या लूकमध्ये एका चर्चेत असलेल्या गाण्यावर डान्स करत आहेत.
सोशल मीडिया हे सध्याच्या घडीचे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मनोरंजन करणारे माध्यम झाले आहे. त्यावर विविध विषयांवरील माहितीपासून ते विविध घटनांचे चांगले-वाईट व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ आपल्या काळजाचा थरकाप उडवतात; तर काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरूणी पारंपारिक मराठमोळ्या लूकमध्ये सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या ‘दिल्ली से मनाली’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या डोक्यावर समई ठेऊन जबरदस्त डान्स स्टेप्स सादर केल्या. शिवाय त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावही पाहण्यासारखे होते.
पाहा व्हिडीओ:
A post shared by Harshali Belwalkar (@harshalibelwalkar0207)
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @harshalibelwalkar0207 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “काहीतरी वेगळं पण सुंदर पाहायला मिळालं” दुसऱ्याने लिहिलेय, “किती पण बघा मन नाही भरत.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “खऱ्या कलावंत”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूपच सुंदर नाचलात”. तर आणखी एकाने व्यक्तीने कमेंट्मध्ये लिहिलंय की, “खरंच खूप भारी”
