Viral Video: सोशल मीडियावर सध्या तरुणींचे डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. विविध गाण्यांवर आकर्षक स्टेप्स, भन्नाट एक्स्प्रेशन आणि हटके डान्समुळे हे व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. अनेक तरुणी आपल्या डान्सची कला सोशल मीडियाच्या माध्यमातून सादर करत असून, त्यांच्या व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात लाइक्स, कमेंट्स आणि व्ह्यूज मिळताना दिसतात. सोशल मीडियामुळे अशा कलाकारांना आपली कला घरबसल्या मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली आहे.
सोशल मीडिया हे आज केवळ मनोरंजनाचे माध्यम राहिले नसून आपली कला आणि कौशल्य सादर करण्याचे प्रभावी व्यासपीठ बनले आहे. डान्स, गायन, अभिनय, चित्रकला, हस्तकला अशा विविध कलांचा व्हिडीओ तयार करून कलाकार तो सोशल मीडियावर शेअर करू शकतात. त्यामुळे कोणत्याही मोठ्या व्यासपीठाची किंवा संधीची वाट न पाहता आपली कला थेट लाखो लोकांपर्यंत पोहोचवता येते. अनेक नवोदित कलाकारांना सोशल मीडियामुळे ओळख मिळाली असून, त्यांच्या कलागुणांना नवी दिशा मिळत आहे.
गौरी-गणपतीच्या सणानिमित्त सध्या सोशल मीडियावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गौरी-गणपतीच्या गाण्यांवर अनेकजण डान्स करत रिल्स तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. लहान मुलांपासून तरुण-तरुणींपर्यंत अनेकजण पारंपरिक वेशभूषेत सुंदर डान्स सादर करताना दिसत आहेत. या रिल्सना नेटकऱ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून, गणेशोत्सवाचा आनंद सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे.
गौरी-गणपतीच्या सणानिमित्त सोशल मीडियावर विविध गाण्यांवरील डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडीओमध्ये दोन तरुणी ‘पार्वतीच्या बाळा’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहेत. पारंपरिक अंदाजातील त्यांच्या नृत्याच्या स्टेप्स आणि उत्साही सादरीकरणाने हा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात या दोघींनी सादर केलेला डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ashwinipansare1
या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूपच भारी केला” एका युजरने लिहिलेय, “एक नंबर डान्स केला राव.” आणखी एका युजरने लिहिलेय, “ताई दोघीही सुंदर नाचलात”
