Viral Video: महाराष्ट्राची लोककला ही राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. लावणी, तमाशा, पोवाडा, भारूड, गोंधळ, वासुदेव, कीर्तन, दहीहंडीतील पथकांचे सादरीकरण अशा विविध लोककलांमधून महाराष्ट्राची संस्कृती जिवंत राहिली आहे. पूर्वी या कला मुख्यतः जत्रा, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपुरत्या मर्यादित होत्या. मात्र, आता सोशल मीडियामुळे या लोककलांना नवे व्यासपीठ मिळाले आहे. कलाकार सोशल मीडिया आणि इतर डिजिटल माध्यमांवर लावणी, पोवाडे, भारूड आणि लोकनृत्यांचे आकर्षक व्हिडिओ शेअर करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कलाकारांनाही देश-विदेशात ओळख मिळत असून नव्या पिढीमध्ये पारंपरिक लोककलेबद्दल आकर्षण वाढताना दिसत आहे. सोशल मीडियामुळे महाराष्ट्राची समृद्ध लोककला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.
पावसाळा सुरू होताच अनेकांना पावसात मनमुराद नृत्य करण्याचा मोह आवरत नाही. थंडगार सरी, आल्हाददायक वातावरण आणि आवडते संगीत यामुळे पावसातील डान्सचा आनंद अधिकच वाढतो. आजकाल अनेक तरुण-तरुणी आणि कलाकार पावसात नृत्याचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करतात, ज्यांना नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.
नृत्य हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून संपूर्ण शरीरासाठी प्रभावी व्यायाम मानला जातो. नियमित डान्स केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, कॅलरी बर्न होतात, स्नायू मजबूत होतात आणि शरीराचा समतोल तसेच लवचिकता वाढते. याशिवाय नृत्यामुळे तणाव कमी होण्यास, मन प्रसन्न राहण्यास आणि आत्मविश्वास वाढण्यासही मदत मिळू शकते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार नृत्याचा व्यायाम म्हणून आनंद घेऊ शकतात.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन तरूणी “झुंजुर मुंजुर” या जुन्या मराठी गाण्यावर नाचताना दिसत आहेत. त्यांच्या डान्स
स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्ही देखील त्यांचे कौतुक कराल.
पाहा व्हिडीओ:
A post shared by Bollyhopdancestudio (@bollyhopdancestudio2023)
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील@bollyhopdancestudio2023 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्युज अन् लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “अंगभर पेहराव करून सुद्धा आपली कला सादर करता येतं याच एक उत्तम उदाहरण ” एका युजरने लिहिलेय, “खूपच छान” आणखी एका युजरने लिहिलेय, “मस्त केलात डान्स”
