Viral Video: समुद्र जितका शांत, संथपणे वाहतो तितकाच तो वेळ आल्यावर त्याचे आक्रमक रूपही दाखवतो. अशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील, ज्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर मजामस्ती करणाऱ्यांना क्षणार्धात आपला जीव गमवावा लागला. सोशल मीडियावर अशा अनेक घटनांचे व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असातात. त्या पाहून आपल्या काळजाचा थरकाप उडतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
काही महिन्यांपूर्वी पावसाच्या पाण्यामुळे धबधबे, नदी, तलावांवरील अशा अनेक घटना घडल्याचे आपण पाहिले आहे. त्यात अनेक जण मजामस्ती करण्याच्या नादात आपला जीव गमावतात. आताही असाच एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यावर युजर्सही संताप व्यक्त करीत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण समुद्राच्या पाण्यात पोहत आहेत. त्यावेळी मधेच पाण्याची एक मोठी लाट येते आणि हे दोघेही पाण्याच्या प्रवाहासह बाहेर येतात. सुखरूप बाहेर येऊनही हे अतिशहाणे तरुण पुन्हा पाण्यात उडी मारतात. पण यावेळी पाण्याच्या प्रवाहासह आतमध्ये जाताना दिसतात. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
हेही वाचा: “रुप तुझे पाहून…” श्रीरामांच्या रुपातील बाप्पाच्या मूर्तीचा सुंदर VIDEO व्हायरल, नेटकरी करतायत कौतुक
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बहुतेक यमराज सध्या सुटीवर आहेत.” हा व्हिडीओ X(ट्विटर)वरील @Cute_girl__29 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत.
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “का करतात असं लोक?” आणखी एका युजरने लिहिलेय, “यांना असंच पाहिजे.” आणखी एकाने लिहिलेय, “बापरे, खूपच खतरनाक.”