Viral Video: सोशल मीडियामुळे डान्सची कला सादर करण्यासाठी प्रत्येकाला एक व्यासपीठ मिळाले आहे. अनेक तरुण-तरुणी, महिला आणि कलाकार आपल्या आवडत्या गाण्यांवर डान्सचे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. काही व्हिडीओंमध्ये पारंपरिक नृत्याला आधुनिक अंदाजाची जोड दिली जाते, तर काही जण ट्रेंडिंग गाण्यांवर आपल्या खास स्टाइलमध्ये डान्स करताना दिसतात. अशा व्हिडीओंना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात लाइक्स, कमेंट्स आणि शेअर्स मिळतात. त्यामुळे सोशल मीडिया हे मनोरंजनासोबतच आपली नृत्यकला आणि कौशल्य जगासमोर आणण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे.
हल्ली सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सादर होणारे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, महाविद्यालयीन फंक्शन किंवा विविध उत्सवांमध्ये तरुण-तरुणी तसेच महिला उत्स्फूर्तपणे डान्स करताना दिसतात. उपस्थितांपैकी काही जण हे क्षण मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर शेअर करतात आणि काही वेळातच हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. विशेष स्टेप्स, हटके अंदाज किंवा उत्स्फूर्त डान्समुळे अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळते.
हल्ली सोशल मीडियावर कपल डान्स व्हिडीओंचीही चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक जोडपी लोकप्रिय गाण्यांवर एकत्र डान्स करतानाचे व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर करतात. काही व्हिडीओंमध्ये रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळते, तर काही जोडपी मजेशीर आणि हटके स्टेप्स करताना दिसतात. या व्हिडीओंना नेटकऱ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून, अनेक कपल डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
एका पती-पत्नीचा रस्त्याच्या कडेला डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ‘छत्री ना खोल बरसात में’ या गाण्यावर हे कपल उत्साहात डान्स करताना दिसत आहे. आजूबाजूचे वातावरण आणि गाण्याच्या तालावर दोघांनी केलेल्या डान्समुळे हा व्हिडीओ लक्षवेधी ठरत आहे. सोशल मीडियावर कपलचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असताना या पती-पत्नीच्या अंदाजाचीही नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @bhawesh_yadav04 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “एक नंबर जोडी” एका युजरने लिहिलेय, “खूपच भारी डान्स” आणखी एका युजरने लिहिलेय, “लयभारी नाचलात दोघे”
