Viral Video: सोशल मीडिया सध्याच्या घडीचे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मनोरंजन करणारे माध्यम झाले आहे. त्यावर विविध विषयांवरील माहितीपासून ते विविध घटनांचे चांगले-वाईट व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ आपल्या काळजाचा थरकाप उडवतात; तर काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक काका-काकू खूप भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.
डान्स हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून शरीराला सक्रिय ठेवणारा एक उत्तम व्यायाम आहे. नियमित डान्स केल्यामुळे शरीराची हालचाल वाढते, कॅलरी खर्च होण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास हातभार लागू शकतो. डान्स करताना हात, पाय, कंबर आणि शरीराच्या इतर स्नायूंचा वापर होत असल्याने स्नायूंची कार्यक्षमता आणि शरीराचा समन्वय सुधारण्यास मदत होते. तसेच, डान्समुळे सहनशक्ती वाढू शकते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. शारीरिक फायद्यांसोबतच डान्सचा मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. आवडत्या गाण्यांवर डान्स केल्याने मन प्रसन्न राहण्यास, तणाव कमी होण्यास आणि मूड सुधारण्यास मदत मिळते.
सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतो. यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. आता अशाच एका महिलेचा डान्स व्हायरल होतोय, ज्यात ती तिच्या पतीबरोबर नाचताना दिसत आहे.
मराठी जुनी गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. काळ बदलला, संगीताची शैली बदलली, तरी जुन्या मराठी गाण्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. या गाण्यांमधील सुरेल चाली, अर्थपूर्ण शब्द आणि भावपूर्ण संगीत मनाला एक वेगळीच अनुभूती देतात. विशेष म्हणजे, आजच्या तरुण पिढीलाही जुन्या मराठी गाण्यांची भुरळ पडताना दिसते. अनेक जण या गाण्यांवर रील्स बनवतात, तर काही जण डान्स करून त्यांना नव्या पद्धतीने सादर करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून जुन्या गाण्यांना पुन्हा एकदा लोकप्रियता मिळत आहे. लावणी, भावगीतं, चित्रपटगीतं आणि रोमँटिक गाण्यांपासून ते सदाबहार सद्गीतांपर्यंत अनेक प्रकारची गाणी आजही आवडीने ऐकली जातात.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काका-काकू एका बागेमध्ये ‘दे टाळी मला’ या गाण्यावर खूपच सुंदर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा डान्स सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे. नेटकरीही त्यांच्या या डान्सचे कौतुक करताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kakade.sanjay या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या असून यावर यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “अहा, काय भारी नाचले रे हे…“, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “महाराष्ट्राची अस्मिता जपणारी जोडी.”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “मराठी अस्सल जोडी”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “कोणी विचारलं ना मला सुख म्हणजे काय असतं तर हा व्हिडिओ 100% दाखवणार त्याला”
