Viral Video: सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतो. यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. आता अशाच एका महिलेचा डान्स व्हायरल होतोय, तिच्याबरोबर एक पुरूषदेखील नाचताना दिसत आहे.

हल्ली सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर वेगवेगळी कला सादर करताना दिसतात, ज्यात डान्स करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळते. परंतु आजकाल काही लोक या कलेचा अपमान करताना दिसतात. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी काही जण मुद्दाम अश्लील पद्धतीचे नृत्य करतात. पण आता असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यातील डान्स पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल.

सोशल मीडिया सध्याच्या घडीचे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मनोरंजन करणारे माध्यम झाले आहे. त्यावर विविध विषयांवरील माहितीपासून ते विविध घटनांचे चांगले-वाईट व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ आपल्या काळजाचा थरकाप उडवतात; तर काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक काका-काकू खूप भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.

हल्ली सोशल मीडियावर कपल्सचे डान्स व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. आवडत्या गाण्यांवर एकत्र डान्स करताना कपल्स सुंदर स्टेप्स आणि रोमँटिक अंदाजात व्हिडीओ तयार करतात. अशा व्हिडीओंमधील त्यांची केमिस्ट्री आणि डान्स पाहून नेटकऱ्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव होत असतो. सोशल मीडिया हे कपल्ससाठीही आपले खास क्षण आणि डान्सची कला इतरांसोबत शेअर करण्याचे माध्यम बनले आहे.

सोशल मीडियावर सध्या कपल्सच्या डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. अशाच एका व्हिडीओमध्ये एक कपल ‘प्यार प्यार करते करते’ या गाण्यावर हटके अंदाजात डान्स करताना दिसत आहे. दोघांनीही गाण्याच्या तालावर सुंदर स्टेप्स सादर केल्या असून, त्यांच्या डान्समधील केमिस्ट्री नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Durga Kora (@durgakora316)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @durgakora316
या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत अनेक लाखो व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या असून यावर यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “काय नाचले राव दोघे“, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “काका-काकू एकच नंबर डान्स”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “खूप भारी एनर्जी”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “लयभारी डान्स”