Viral Video: आजच्या डिजिटल युगात डान्स आणि सोशल मीडिया हे अनेकांसाठी केवळ मनोरंजनाचे माध्यम राहिलेले नाही, तर उत्पन्नाचे साधनही बनले आहे. अनेक डान्सर्स इंस्टाग्राम, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले नृत्याचे व्हिडीओ शेअर करून मोठा प्रेक्षकवर्ग तयार करत आहेत. लोकप्रियता वाढल्यानंतर त्यांना ब्रँड प्रमोशन, जाहिराती, सशुल्क सहकार्य, लाईव्ह परफॉर्मन्स आणि प्लॅटफॉर्मच्या कमाईच्या विविध सुविधांमधून उत्पन्न मिळते.

हल्ली सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर वेगवेगळी कला सादर करताना दिसतात, ज्यात डान्स करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळते. परंतु आजकाल काही लोक या कलेचा अपमान करताना दिसतात. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी काही जण मुद्दाम अश्लील पद्धतीचे नृत्य करतात. पण आता असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यातील डान्स पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल.

सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतो. यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. आता अशाच एका महिलेचा डान्स व्हायरल होतोय, ज्यात ती तिच्या पतीबरोबर नाचताना दिसत आहे.

सोशल मीडिया सध्याच्या घडीचे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मनोरंजन करणारे माध्यम झाले आहे. त्यावर विविध विषयांवरील माहितीपासून ते विविध घटनांचे चांगले-वाईट व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ आपल्या काळजाचा थरकाप उडवतात; तर काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक काका-काकू खूप भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.

सोशल मीडियामुळे पती-पत्नीमधील भांडणं, प्रेम, मजामस्ती अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एकवेळ पती-पत्नीचे गुण नाही जुळले तरी चालेल पण त्यांची आवड-निवड जुळायला हवी. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओतील पती-पत्नीची जोडी ‘उधळीत येरे गुलाल सजना’ या गाण्यावर सुंदर डान्स करत आहेत. त्यांचा हा डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Sanjay Kakade (@kakade.sanjay)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kakade.sanjay या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “आवडणार नाही असे कधीच होणार नाही कारण always do best”. तर दुसऱ्याने लिहिलंय की, “हेवा वाटावा असं कुटुंब आहे. कुणाची नजर ना लागो”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “भाई तुमची संपूर्ण फॅमिली कमा