Viral video: असे अनेक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियाच्या समुद्रात तरंगताना दिसतात, जे तुम्हाला फक्त एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा पाहायला आवडतात. अनेकजण आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी मुद्दाम असे व्हिडिओ बनवतात, तर काही लोक इतरांच्या कृती कॅमेऱ्यात टिपतात. ज्यानंतर तो व्हायरल होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती लग्नात डान्स करताना दिसत आहे. हा डान्स पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.
सोशल मीडियावर या काकांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. पण हे काका म्हणायला फक्त वयापुरतेच आहेत. त्यांची एनर्जी एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी आहे. माणूस वयाने मोठा झाला तरी त्याने मनाने कायम तरूण असलं पाहिजे, असं बोललं जातं. पण हे वाक्य काकांनी खरं करून दाखवलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की सुरुवातीला तो तुम्हाला एक सामान्य डान्स वाटेल, पण गाणे सुरू होताच काका असे काही नाचतात की तुम्हीही पाहतच रहाल. नाच रे मोरा आब्यांच्या वनात नाचरे मोरा नाच या गाण्यावर यांनी काकांनी डान्स केला आहे.यावेळी त्यांच्या एकापेक्षा एक भारी स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून तुम्हीही लोट-पोट व्हाल.
विशेष म्हणजे ते काही विचित्र पद्धतीने चेहरा करत आहेत हे पाहून नेटकरी त्यांची खिल्ली उडवत आहेत.सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. तुम्ही आजकाल अनेक वयस्कर लोकांना देखील डान्स करताना पाहिलं असेल
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील balubhoi8 या अकाउंटवर पोस्ट केलेला आहे. सध्या लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत आणि मजेदार कमेंट्सही येत आहेत. यूजर्स लिहित आहेत की “काकांनी राडा केला” तर आणखी एका यूजरने लिहिले की “असा डान्स करायला हिम्मत लागते, तरुणाईही यांच्यासमोर लाजली असेल.” एवढेच नाही तर व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर काही दिवसातच व्हिडिओला २ लाखांहून अधिचे लाईक्स मिळाले आहे तर लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.
