Viral video: सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, कधी भायवह अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. डान्स रिल्सचे तर अनेक भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये अगदी वयोवृद्ध लोक देखील भन्नाट अशा एक्सप्रेशन आणि स्टेप्ससह डान्स करत असतात. सध्या असाच एक मामांच्या डान्सचा भन्नाट असा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. तुम्ही आजकाल अनेक वयस्कर लोकांना देखील डान्स करताना पाहिलं असेल अशाच एका मामांनी हळदीला मामींसाठी भन्नाट डान्स केला आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी व्हिडिओचा आनंद लुटला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, जबाबदाऱ्या तर आयुष्यभर संपणार नाहीत संधी मिळेल तेव्हा असा आनंद लुटता आला पाहिजे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या मामांनी एक हळदीच्या कार्यक्रमात डान्स केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यावेळी मामांचा डान्स पाहून मामी लाजून लाल झाल्या आहेत. इतर मंडळीही पोट धरुन हसताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.विशेष म्हणजे ते काही विचित्र पद्धतीने चेहरा करत आहेत हे पाहून काकांचे सगळे मित्र त्यांची मजा घेत आहेत. एका व्यक्तीने तर काकांच्या कपाळाला चक्क ५०० शी नोट चिटकवली आहे.
पाहा व्हिडीओ
काकांचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून तो व्हिडिओ akash_sable111 या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नेटकरीही व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दत आहेत. एवढेच नाही तर व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर काही दिवसातच व्हिडिओला १५ हजारांपेक्षा अधिचे लाईक्स मिळाले आहे तर हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.
