बाबो! असलं वादळ पाहून अंगावर काटा येईल, कॅनडातल्या चक्रीवादळाचा VIDEO VIRAL

एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भयंकर चक्रीवादळ पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हादरुन जाईल.

Landspout-Viral-Video
(Photo: Twitter/ winstonwildcat )

निसर्गात नेहमीच आपल्याला अद्भुत दृश्य पाहायला मिळत असतात. कधी भयंकर पाऊस, कधी कडक ऊन, कधी त्सुनामी तर कधी चक्रीवादळ. काही दृश्ये खूपच थक्क करणारी असतात तर आणि काही अगदी हृदय पिळवटून टाकणारी असतात. तुम्ही चक्रीवादळ पाहिले असेल. वास्तविक वाऱ्याला जेव्हा हिंसक वळण मिळते तेव्हा त्याला चक्रीवादळ म्हणतात. काही चक्रीवादळं कमी प्रभावी असतात, तर काही इतके धोकादायक असतात की ते वादळाचे रूप धारण करतात आणि अगदी मोठ्या गोष्टी देखील सोबत घेऊन जातात. चक्रीवादळांशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भयंकर चक्रीवादळ पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हादरुन जाईल.

कॅनडाच्या सस्काचेवान प्रांतात गेल्या आठवड्यात एक विचित्र घटना नोंदवली गेली. कॅनडातल्या वॅटरस शहरात एक भूगर्भीय चक्रीवादळ दिसले. या चक्रीवादळाला लॅंडस्पाउट असं म्हणतात. NOAA Severe Storms Laboratory च्या मते, लॅंडस्पाउट म्हणजे एक अरुंद, दोरीसारखे कंडेन्सेशन फनेलच्या आकारात असलेले चक्रीवादळ आहे. यात गडगडाटी ढग मोठ्या प्रमाणात दिसून येतात आणि हे चक्रीवादळ जमिनीवरून सुरू होतं आणि तो वरच्या बाजूस मोठा होऊन खूप वेगाने फिरू लागतो. वादळाच्या आत वरच्या दिशेने जाणारा अतिशय शक्तीशाली वारा असतो, जो सिलेंडरसारखा आकार घेतो. वाढती हवा फिरणारा सिलेंडर उचलते. हवेचा हा सिलेंडर तळाशी पातळ असतो.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सलूनमध्ये न्हाव्याने लावलेलं सलमान खानचं गाणं ऐकून ग्राहक रडू लागला

हा दुर्मिळ वादळाचे दृश्य पाहून तिथले लोक खूपच घाबरून गेले होते. हे भयानक वादळ पाहण्यासाठी लोक घराबाहेर पडत होते. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला वादळाचा अंदाज येईल की ते किती भयानक असेल. डग्लस थॉमस या युजरने या भयानक वादळाचा व्हिडीओ शूट करून तो ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये वादळ हळुहळू जमिनीवर धडकणार असल्याचं दिसून येतं.

हा व्हिडीओ एका समुद्रकिनाऱ्यावर कॅप्चर करण्यात आला आहे. यात हे भयानक वादळ पाहून एक स्त्री जोरजोरात ओरडताना ऐकू येत आहे. “अरे देवा! हे एक वादळ आहे” असं ती जोरजोरात ओरडतेय. कारण समुद्रकिनारी फिरायला आलेले लोक कुतूहलाने या वादळाकडे पाहत आहेत. हे वादळ पाहून तिथले सारेच जण आश्चर्यचकित झाले आहेत.

आणखी वाचा : चिमुकल्याची ही जादू पाहून तुम्ही सुद्धा चक्रावून जाल, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चमत्कार! कुटुंबाचं सुरू होतं एकत्र जेवण, अचानक कोसळला सिलिंग फॅन, पाहा कसा वाचला मुलाचा जीव

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ६ लाख ११ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तर साडे चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video unusual landspout emerges in canada town shocks beachgoers prp

Next Story
“झाडं कापली तरी ‘आरे’मध्ये बिबट्या आहे”; म्हशींच्या गोठ्यातील ‘हा’ Viral Video पाहून तुम्हालाही उद्धव ठाकरेंचं म्हणणं पटेल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी