Viral Video: नऊ वर्षांच्या मुलाचे पराठे बनवण्याचे हटके कौशल्य पाहाच; नेटीझन्स करतायेत कौतुक

फरिदाबादच्या या नऊ वर्षाच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचा पराठा पलटण्याची स्टाइल पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

paratha boy
व्हायरल व्हिडीओ (फोटो: FOODY VISHAL / YouTube)

काही दिवसांपूर्वी तुम्ही एका मुलाचा व्हिडीओ पाहिला असेल ज्यामध्ये तो ‘बसपन का प्यार कहीं भूल नहीं जाना तू’ हे गाणे गुणगुणत होता. जेव्हा त्याचा व्हिडीओ हिट झाला तेव्हा तो मुंबईला पोहोचला आणि प्रसिद्ध रॅपर बादशाहसोबत दिसला. एका साध्या आणि गरीब कुटुंबातील एका निरागस मुलाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो आपल्या खास आणि वेगळ्या स्टाइलने पराठे बनवून लोकांची मने जिंकत आहे.

या मुलाचे नशीब चमकेल का?

या नऊ वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ इतका हिट झाला आहे की, तो आतापर्यंत जवळपास १५ लाख वेळा पाहिला गेला आहे. परंतु नेटिझन्सनी या मुलाचे कौतुक करण्यासोबतच त्याच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की काही दिवसांपूर्वीच एका १३ वर्षांच्या मुलाने चायनीज खाद्यपदार्थ विकतानाचा व्हिडीओ लोकांना प्रभावित केला होता. त्याची मेहनत आणि परस्थिती पाहून काही लोक त्याच्या कुटुंबाला मदत करण्यासही तयार झाले.

(हे ही वाचा: लज्जास्पद! ‘कंबरेचा आकार,बेडवरील कपडे…’ मुलाची मॅट्रिमोनिअल साइटवरची जाहिरात व्हायरल )

फरिदाबादच्या या नऊ वर्षाच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचा पराठा पलटण्याची स्टाइल पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या २३ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये या मुलाच्या कुटुंबाबद्दल आणि पार्श्वभूमीबद्दल फारशी माहिती दिलेली नाही. फूडी विशालने यूट्यूबवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो मुलगा एका मोठ्या तव्यावर पराठा बनवताना दिसत आहे. एखाद्या प्रोफेशनल शेफप्रमाणे, जो त्याचा प्रत्येक पराठा पलटतो आणि चांगला भाजतो, तेही अतिशय स्वच्छ आणि सक्रिय पद्धतीने. या मुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

( हे ही वाचा: Viral: तामिळनाडूमध्ये पावसात दोन सापांचा डान्स; झोहोच्या सीईओने शेअर केला व्हिडीओ )

( हे ही वाचा: शेरशाह चित्रपटातील हिट गाणं ‘राता लंबिया’ सातासमुद्रापार पोहोचलं; आफ्रिकन जोडप्याचा व्हिडीओ व्हाय )

नेटकऱ्यांनी चिंता केली व्यक्त

नेटिझन्स देखील या मुलाबद्दल त्यांची चिंता व्यक्त करत आहेत, विशेषत: त्याचे भविष्य सर्वांनाच सतावत आहे कारण हे त्याचे लिहण्यावाचण्यासोबत खेळण्याचे आणि उड्या मारण्याचे वय आहे. पण ज्या आर्थिक असहायतेने तो त्याच्या कुटुंबाला मदत करत आहे.त्याचे कौतुक केले जात आहे.काही लोक मुलाच्या टॅलेंटने आश्चर्यचकित झाले आहेत, तर काहीजण त्याच्या मदतीसाठी पुढे येण्याचा विचार करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video watch the nine year old boys skill in making parathas appreciate the netizens ttg