Premium

काय सांगता? लग्नात पाहुणे मंडळीच काउंटरवर भाजतायत पोळ्या; मजेशीर Video नक्की बघा…

एका लग्न समारंभाला हजेरी लावलेले पाहुणे स्वतःच गॅसवर पोळ्या भाजताना दिसले आहेत.

Viral Video Wedding Guets seen Prepare their own rotis At food counter
(सौजन्य:ट्विटर/@WokePandemic) लग्नात पाहुणे मंडळीच काउंटरवर भाजतायत पोळ्या !

हिवाळा म्हणजे सुट्टी आणि लग्नाचा सिजन. काहीजण सुट्टीचे प्लॅन बनवण्यात, तर काही जण लग्न समारंभांना उपस्थिती लावतात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, गावी लग्न समारंभ असेल तर जेवणासाठी पंगत असते. पण, शहरात सहसा बुफे सिस्टम असते. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका लग्न समारंभाला हजेरी लावलेले पाहुणे स्वतःच गॅसवर पोळ्या भाजताना दिसले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ लग्न समारंभाचा आहे. पाहुण्यांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे. तिथे दोन व्यक्ती हातात जेवणाचे ताट घेऊन उभ्या आहेत. तसेच आश्चर्याची गोष्ट अशी की, टेबलावर गॅस ठेवण्यात आला आहे आणि या गॅसवर तवा ठेवून दोन्ही व्यक्ती पोळ्या भाजताना दिसून येत आहेत. एका हातात जेवणाचे ताट, तर दुसऱ्या हाताने या दोन्ही व्यक्ती स्वतःसाठी गॅसवर पोळ्या भाजून घेताना दिसत आहेत.

हेही वाचा…मॉलमध्ये सांताक्लॉज पाहून चिमुकला धाव सुटला अन् पुढे…; Video पाहून तुमच्याही चेहऱ्यावर खुलेल हसू

व्हिडीओ नक्की बघा :

कार्यक्रमात किंवा लग्न समारंभात तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, पाहुण्यांसाठी जिथे जेवणाची सोय करण्यात येते, तिथे आपण स्वतःच ताटात जेवण वाढून घेतो किंवा कर्मचारी तिथे असतात, ते आपल्याला जेवण ताटात वाढतात. पण, इथे तर चक्क लग्नाला आलेले पाहुणे गॅस चालू करून त्यावर तवा ठेवून स्वतःसाठी पोळ्या गरम करताना दिसले आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, पोळ्या लाटून दिल्या जात आहेत आणि लग्न समारंभातील हे दोन पाहुणे गॅसवरील पोळी भाजून घेऊन स्वतःच्या ताटात ठेवताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @WokePandemic या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला ‘विसरून गेलो की मी लग्नात आलो आहे, इथे तर जेवण तयार मिळतं’ असे मजेशीर कॅप्शन देण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियावर या मजेशीर व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video wedding guets seen prepare their own rotis at food counter asp

First published on: 02-12-2023 at 19:46 IST
Next Story
प्रेमासाठी वाट्टेल ते! प्रियकरासाठी नेदरलँडहून भारतात आली प्रेयसी, दोघांच्या लग्नाचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल