scorecardresearch

मच्छीमारांना पाण्यात सापडलं खेळणं, बादलीत टाकल्यावर मात्र निघाला दुर्मिळ जीव, जाणून घ्या यामागचं रहस्य

समुद्रात सापडलेला हा जलचर प्राणी लहान मुलांच्या खेळण्यासारखा दिसत आहे

मच्छीमारांना पाण्यात सापडलं खेळणं, बादलीत टाकल्यावर मात्र निघाला दुर्मिळ जीव, जाणून घ्या यामागचं रहस्य
निसर्गात असे अनेक जीव आहेत ज्यांच्याबद्दल आपणाला अद्यापही काही माहिती नाही. (Photo : Twitter)

निसर्गात असे अनेक असे वन्यजीव आहेत ज्यांच्याबद्दल आपणाला अद्यापही काही माहिती नाही. शिवाय या सृष्टीत असणाऱ्या असंख्य जीवांना आपण अजूनही पाहिलेलं नाही. पण आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक जंगली प्राण्यांचे असो वा समुद्रातील दुर्मिळ जीवांचे वेगवेगळे व्हिडीओ आपण सहजरित्या पाहू शकतो.

समुद्राच्या आतमध्ये जाणण्यासारखं बरंच काही आहे आणि समुद्रातील सर्व गोष्टी आपणाला अद्यापही माहित नाहीत. त्यामुळे समुद्राच्या पोटात नक्की काय काय आहे? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. यासाठी अनेक शास्त्रज्ञ संशोधन करत असतात. पृथ्वीच्या बाहेर म्हणजे अंतराळात जसं वेगळं जग आहे. तसंच समुद्रातील पाण्याच्या आतही एक वेगळे जग आहे, ज्याबद्दल वेळोवेळी संशोधन केले जातं.

हेही पाहा- माणूस आहे की बाहुबली? तरुणाने एकाचवेळी उचलल्या दोन बाईक, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

मात्र अनेक वेळा सर्वसामान्यांना त्याची संपूर्ण माहिती मिळू शकत नाही. सध्या अशाच एका सागरी जीवाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. समुद्रात सापडलेला हा जलचर प्राणी एखाद्या लहान मुलांच्या खेळण्यासारखा दिसत आहे, पण त्याचे काळे डोळे दिसत आहेत. हा व्हिडिओ @weirdterrifying या ट्विटर नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात अनेकदा विचित्र प्राणी आढळल्याचे आपण अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. अशातच आता आणखी एक आश्चर्यकारक असा लाल रंगाचा प्राणी मच्छिमारांना सापडला आहे. मच्छिमार मासेमारी करताना एकाच वेळी शेकडो जाळी टाकत असतात. अशा परिस्थितीत माशांसोबतच इतर अनेक गोष्टी त्यांच्या जाळ्यात अडकतात.

हेही पाहा- सिग्नल तोडून कार अचानक ट्रॅफिकमध्ये घुसली, भयंकर अपघाताचा Video पाहून अंगावर येईल शहारा

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही मच्छिमार बोटीत मासे पकडताना दिसत आहेत. त्यावेळी त्यांच्यातील एका व्यक्तीच्या हातात लाल रंगाचा खेळण्यासारखा प्राणी सापडतो. यावेळी तिथे उपस्थित व्यक्तीने या प्राण्याचा व्हिडीओ शूट केला, जो सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओत हा प्राणी एका सपाट खेळण्यासारखे दिसतं आहे. याचवेळी एक मच्छीमार या जलचर प्राण्याला हातात घेऊन पाण्यात टाकतो, तसे तो डोळे विस्फारताना दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये- “मच्छिमारांने कॅमेरात काहीतरी विचित्र कैद केले आहे.” असं लिहिलं आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेकजण त्यावर वेगवेळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने हा प्राणी पोकेमॉनसारखा दिसत असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने हा प्राणी ऑक्टोपस सारखा दिसत असल्याचा दावा केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 18:11 IST

संबंधित बातम्या