Jungle Viral Video: मैत्रीसाठी काही पण, असा डायलॉग तुम्ही अनेकदा ऐकला असेल. याचे दाखले आपण अनेकदा सोशल मीडियावर पाहतो. या ठिकाणी आपल्याला माणसांचीच नव्हे तर प्राण्यांची मैत्रीदेखील पाहायला मिळते. या जगात अशी एकही व्यक्ती नसेल, जिचा एकही मित्र नाही. मैत्री हे एक असे नाते आहे, जे रक्ताचे नाते नसले तरी त्यात प्रेम आणि आपुलकी असते. अनेकदा मैत्रीचे नाते रक्ताच्या नात्यांपेक्षा खूप घट्ट असते. मग ती मैत्री माणसांची असो किंवा प्राण्यांची, या नात्यामध्ये नेहमीच आपलेपणा पाहायला मिळतो. अशाच एका अनोख्या मैत्रीचा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडियामुळे सतत नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. त्यामध्ये कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात; तर काही प्राण्यांमध्ये भांडण वा मैत्री पाहायला मिळते. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या डुक्कराची त्याचा मित्र कशी सुटका करतो हे पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून दोन डुक्कराची पिल्ले जात असून यावेळी अचानक तिथे बिबट्या येतो आणि त्यातील एका डुकराला आपल्या जबड्यात पकडतो. आपल्या मित्राला बिबट्याने पकडलेलं पाहून दुसरे डुक्कर तिथून पळून न जाता त्याच्याकडे पाहत उभा राहतो. यावेळी अचानक बिबट्या जबड्यात पकडलेले डुक्कर मरण पावले असे समजून त्याला सोडून दुसऱ्या डुकराच्या पाठीमागे धावतो. पण, यावेळी बिबट्याची फजिती होते. ते दोन्ही डुक्करं खूप दूर पळून जातात, त्यामुळे बिबट्याच्या हाती काहीच लागत नाही. या व्हिडीओतून एका डुकराने दुसऱ्या डुकराला वाचवण्यासाठी वापरलेल्या युक्तीचे नेटकरी खूप कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shamad9122 या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत २० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत. यावर एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘जास्त मिळवण्याची हाव नेहमीच घात करते’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘त्याने मित्राचा जीव वाचवला’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘मित्राचं प्रेम.’