Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच विविध व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. अनेक जण नवनवीन रील्स व्हिडीओ बनवण्यासाठी कधी काय करतील हे देखील सांगता येत नाही. काही लाइक्स आणि व्ह्यूज मिळाव्या यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालायलादेखील मागे पुढे पाहत नाहीत. असे अनेक प्रकारचे व्हिडीओ आपण आजपर्यंत सोशल मीडियावर पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून या दिवसात निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी लोक आवर्जून फिरायला जात आहेत. कधी धबधब्यावर तर कधी नदीच्या किनाऱ्यावर जाऊन रील्स बनवतात. पावसाळ्यात या ठिकाणी पाण्याचा प्रवाह भरपूर असतो, तरीही लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रील्स बनवतात. सध्या एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक तरुण डोंगरातील उतार भागात रील्स बनवण्यासाठी गेल्याचे दिसत आहे. पण, पुढे अचानक असं काहीतरी होतं जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)
या व्हायरल व्हिडीओमधील तरुण एका डोंगरावर फिरायला गेल्याचे दिसत आहे. यावेळी डोंगरावरील संपूर्ण दृष्य सुंदर दिसत असून अशा वातावरणात तरुण रील बनवायला सुरुवात करतो. यावेळी तो डोंगरावरील उतार भागात जातो आणि अचानक थेट खाली पडतो. तरुण जोरात पडल्यामुळे नक्कीच त्याला दुखापत झाली असणार, सध्या हा व्हिडीओ चर्चेत असून नेटकरी या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ajee_jeeju_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत ४५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर तीन मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “कॅमेरामॅन परफेक्ट शॉट घेण्याच्या तयारीत आहे”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “मला हसावं की रडावं हेच कळेना”, तिसऱ्या युजरने लिहिलेय, “असाच एक दिवस जीव जाईल”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “हॅप्पी जर्नी भावा”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “लोक लाइक्सच्या नादात काहीही करतात.”
© IE Online Media Services (P) Ltd