scorecardresearch

ढाब्यावर विश्रांती घेणाऱ्या लोकांवर काळाने घातला घाला, थरारक Video पाहून अंगावर येईल काटा

ढाब्यात लोक निवांत बसले असताना रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाणारी एक पिकअप ढाब्यात घुसल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

ढाब्यावर विश्रांती घेणाऱ्या लोकांवर काळाने घातला घाला, थरारक Video पाहून अंगावर येईल काटा
सध्याच्या या धावपळीच्या काळात कोणाचा कधी आणि कुठे अपघात होईल हे सांगता येत नाही. (Photo : Twitter)

सध्याच्या या धावपळीच्या युगात कोणाचा कधी आणि कुठे अपघात होईल हे सांगता येत नाही. वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना आपण याआधी पाहिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पिकअप थेट ढाब्यात घुसल्यामुळे अनेक लोकं गंभीर जखमी झाले आहेत.

हेही पाहा- आजोबांनी विचारलेल्या विचित्र प्रश्नापुढे झाली गुगलची बोलती बंद; Video पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

अपघाताचा हा धक्कादायक व्हिडीओ गुजरातमधील असल्याची माहिती समोर आली आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही लोक ढाब्यामध्ये आराम करत आहेत, तर काहीजण दिलेल्या ऑर्डरची वाट पाहात असल्याचं दिसतं आहेत. शिवाय ढाबा रस्त्यालगत असल्यामुळे अनेक लोक रस्त्यावरुन ये-जा करतानाही व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

दरम्यान, लोक निवांत बसले असताना अचानक रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाणारी एक पिकअप ढाब्यात घुसल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे. शिवाय पिकअप अचानाक ढाब्यात शिरल्याने ढाब्यातील लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही कळायच्या आत पिकअपने अनेकांना धडक दिली आहे. शिवाय ढाब्यातील टेबल खुर्चांचा चक्काचूर झाल्याचं दिसतं आहे. या अपघाताची धक्कादायक दृश्य पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.

या अपघाताचा व्हिडीओ @bhaiyaji25 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून ही घटना सुरतमधील असल्याचे कॅप्शनमध्ये लिहलं आहे. तसंच अशाप्रकारे दुर्घटना घडतात? असा प्रश्न ट्विटर धारकाने उपस्थित केला आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत १ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर नागरिकांना रस्त्यावरुन जाताना अपघात होईल म्हणून स्वत:ची काळजी घ्यावी लागते हे माहित होतं. मात्र, आता ढाब्यात बसले असतानाही अपघाताला सामोरं जावं लागणार आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 15:39 IST

संबंधित बातम्या