Viral Video: देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधारेमुळे बऱ्याच शहरांमध्ये रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, अनेक पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. पण, अनेक जण जोरदार पाऊस असूनही पावसाच्या दिवसात धबधब्यांवर भिजण्यासाठी जाऊन मजामस्ती करताना दिसतात. अशा ठिकाणी गेल्यावर कित्येक जण धोका पत्करून रील बनविण्यातही मग्न झाल्याचेही पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या अनेक घटनांमध्ये धबधब्यांवर भिजता भिजता अचानक वाढणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे काहींना जीवही गमवावा लागला आहे. अशा अनेक घटनांदरम्यानचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय; जो पाहून नेटकरी संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. पण, काही तरुण मंडळी पावसाच्या पाण्यात उतरून रील्स बनविताना दिसत आहेत; तर अनेक जण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, नदीच्या पाण्यात उड्या मारत आहेत. काही जण धबधब्यांवर जाऊन मजामस्ती करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी धबधब्यावरील एका तरुणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात त्याचा दगडावरून पाय घरसला होता. आता पुन्हा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून युजर्स संताप व्यक्त करीत आहेत.

Young Man Swept Away by Flood
एवढी घाई कशाची! पुराच्या पाण्यात वाहून जात होता तरुण, वेळीच लोक धावून आले; व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Two youths were washed away in the sea water
‘स्वतःच्या जीवाशी खेळ…’ सुमद्राच्या पाण्यात मजामस्ती करणं आलं अंगलट; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “यमदेव तुम्हाला…”
father and mother cried at the moment of kanyadaan at daughters wedding ceremony
मायबापासाठी सर्वात कठीण क्षण! लेकीच्या कन्यादानावेळी आईवडीलांना अश्रु अनावर, Video पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
A bull Picked up a four-wheeler vehicle with full of people
बापरे! बैलाने चक्क माणसांनी भरलेली चारचाकी गाडी उचलली; Video पाहून येईल अंगावर काटा
Biker performs dangerous stunt
‘यालाच खरं प्रेम म्हणतात का?’ स्टंटच्या नादात प्रेयसीचा जीव घातला धोक्यात; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
cat's stunning expression on the marathi song
‘आप्पांचा विषय लय हार्ड…’ गाण्यावर बोक्याचे जबरदस्त एक्स्प्रेशन; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “पासवर्ड म्याव म्याव…”
a man helped women to cross the road | Viral Video
माणसं ओळखायला आपण चुकतो! ज्याला जग वेडा समजत होते तोच खरा शहाणा निघाला; VIDEO एकदा पाहाच

नक्की व्हिडीओ काय घडलं? (Viral Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण धबधब्याच्या ठिकाणी जातो, यावेळी दुसरा एक जण मागून त्याचा व्हिडीओ शूट करीत आहे. पण, धबधब्याजवळ जाता जाता एका तरुणाचा पाय अचानक एका दगडावरून घसरतो आणि त्याच दगडावरून घसरत घसरत तो पाण्यात पडतो. यावेळी कदाचित त्या तरुणाच्या पोटाला खरचटल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @pubity या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत १२ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि चार लाख लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स त्यावर कमेंट्सही करताना दिसत आहेत.

हेही वाचा: थरारक घटना! वाऱ्याच्या वेगाने आला बिबट्या अन् गाडीवर केला हल्ला; पुढच्या पाच सेकंदात जे घडलं VIDEO पाहून फुटेल घाम

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “खूप लागलं असणार याला.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “रीलच्या नादात काहीही होऊ शकते.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “त्याला वाचवायचं सोडून शूट काय करतोयस.” तर आणखी एकाने लिहिलेय, “अशा लोकांबरोबर असंच व्हायला हवं.”