Viral Video Wife Dance For Husband AT Family Function : काही लोकांचं जोडीदारावर भरपूर प्रेम असते. पण, वेळेनुसार त्यांच्यातील रोमांस हळूहळू कमी होऊ लागतो. पण, माणसा-माणसानुसार नात्यांची व्याख्या बदलते. काही जणांचं प्रेम वयानुसार कमी होत नाही तर उलटं आणखीन वाढतं जाते. आज सोशल मीडियावर हेच दृश्य दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये वृद्ध जोडप्याने कमाल केली आहे.
एका कार्यक्रमात महिलेने आपल्या वृद्ध महिलेने नवऱ्यासाठी जबरदस्त डान्स केला आहे. ६५ वर्षाची आई आणि ७३ वर्षाचे बाबा यांच्यातील खास क्षण मुलगी रुचिता मिश्राने शेअर केला. चमकदार पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान आईने १९८९ च्या ‘चांदनी’ चित्रपटातील ‘मेरे हाथों में नौ नौ चूडियां’ या क्लासिक बॉलिवूड गाण्यावर अगदी उत्साहाने डान्स केला आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी तिला प्रोत्साहन सुद्धा दिले.
“या वयातील त्यांची केमिस्ट्री” (Viral Video)
बॉलिवूड गाण्यावर नाचणाऱ्या बायकोला पाहून नवरा मात्र तिच्याकडे पाहून लाजताना दिसत आहेत. ‘मेरे हाथों में नौ नौ चूडियां’ या गाण्याच्या प्रत्येक ओळीवर महिलेच्या स्टेप्स आणि तिचे हावभाव अगदी बघण्याजोगे आहेत. त्यामुळे आजोबांची नजर अजिबात हटत नाही आहे. मध्येच लाजतात, मध्येच टक लावून बघतात तर कधी नजर एकदम खाली करून बसलेले दिसतात. बायकोने या वयात नवऱ्यासाठी केलेला सुंदर डान्स व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @no_ordinary_life_podcast या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी “प्रेम आणि मजा करण्याची भावना वयानुसार कमी होत नाही”, “आयुष्यात एक दिवस अशीच सुंदर प्रेमकथा अनुभवायला मिळावी”, “त्यांनी सारख्या रंगाचे कपडे देखील घातले आहेत”, “या वयात त्यांची केमिस्ट्री अगदी बघण्यासारखी आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
