Viral Video: सोशल मीडियावर सध्या जंगल आणि निसर्गरम्य ठिकाणांमधील व्हिडीओंना मोठी पसंती मिळताना दिसते. हिरवाईने नटलेला परिसर, उंच झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट आणि जंगलातील शांत वातावरण कॅमेऱ्यात कैद करून अनेकजण हे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशा व्हिडीओंमधून निसर्गाचं मनमोहक सौंदर्य पाहायला मिळत असल्याने ते नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात आणि अनेकदा मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात.

जंगलातील जीवन वरून जितकं सुंदर आणि शांत वाटतं, तितकंच ते संघर्षमय असतं. प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असते आणि त्यामुळे अनेक प्राणी शिकार करून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडताना दिसतात. शिकारीचा पाठलाग, शिकार पकडण्यासाठी केलेली धावपळ आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा संघर्ष हा जंगलातील जीवनचक्राचा महत्त्वाचा भाग आहे. सोशल मीडियावर असे व्हिडीओ समोर आल्यावर जंगलातील प्राण्यांच्या जगण्याची ही कठीण बाजूही पाहायला मिळते.

अनेकदा जंगलात शिकार मिळवण्यासाठी केलेली मेहनतही वाया जाते. एखाद्या प्राण्याने मोठ्या प्रयत्नाने शिकार पकडल्यानंतर दुसरा बलाढ्य प्राणी ती शिकार हिसकावून घेऊन जातो. त्यामुळे जंगलातील जीवन हे केवळ शिकार करण्यापुरते मर्यादित नसून, आपले अन्न टिकवून ठेवण्यासाठीही प्राण्यांना सतत संघर्ष करावा लागतो. अशीच एक घटना एका जंगलात घडल्याचे पाहायला मिळत आहे.

जंगलात शिकार मिळवण्यासाठी प्रत्येक प्राण्याला मोठा संघर्ष करावा लागतो. तरस आणि जंगली कुत्रे हेही संधी मिळताच इतर प्राण्यांची शिकार मिळवण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या प्राण्याने मेहनतीने शिकार पकडल्यानंतर त्यावर दुसऱ्या प्राण्यांची नजर पडली, तर शिकार हिसकावण्यासाठी त्यांच्यात चुरस पाहायला मिळते. अशा प्रसंगांमधून जंगलातील अन्नसाखळी आणि जगण्यासाठी सुरू असलेली सततची धडपड स्पष्टपणे दिसून येते.

या व्हायरल व्हिडीओमध्ये जंगली कुत्र्यांचा एक कळप मोठ्या मेहनतीने एका प्राण्याची शिकार करताना दिसतो. बराच वेळ पाठलाग करून अखेर ते शिकार करण्यात यशस्वी होतात. मात्र, त्यांची मेहनत फळाला येणार इतक्यात अचानक तरसांचा कळप तिथे पोहोचतो आणि जंगली कुत्र्यांकडून ती शिकार हिसकावून घेऊन जातो. त्यामुळे मेहनतीने मिळवलेली शिकार क्षणात गमावल्याचे दृश्य या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ युट्यूबवरील @Latest Sightings या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “बापरे खूपच भयानक” एका युजरने लिहिलेय, “बिचारे जंगली कुत्रे” आणखी एका युजरने लिहिलेय, “वाईट अंत”