Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. त्यावरील काही व्हिडीओंमुळे आपल्या चेहऱ्यावर हसू येतं; तर काही व्हिडीओंमुळे आपल्या काळजाचा थरकाप उडतो. सोशल मीडियावर बऱ्याचदा प्राण्यांचेही अनेकविध प्रकारचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. त्यामध्ये अनेकदा काही प्राणी एकमेकांशी भांडण करताना, तर काही प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर सिंगापूरच्या चांगी विमानतळावरील एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक माकड विमानतळावर पोहोचल्याचे दिसत आहे. हा विषय सध्या गूगल ट्रेंडवरही खूप चर्चेत आहे.
प्राणीदेखील मनुष्यांप्रमाणेच हुशार असतात. त्यांनाही माणसांप्रमाणे भावना असतात आणि त्यामुळे त्यांना जर कोणी विनाकारण त्रास देत असेल, तर ते त्यावर लगेच प्रतिकार करतात. आजपर्यंत माकडाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील आणि त्यातील काही व्हिडीओंमध्ये माकडाचे रौद्र रूपही पाहायला मिळाले असेल. पण, अनेकदा प्राण्यांशी प्रेमाने बोलल्यावर तेदेखील आपल्याशी तसेच वागतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ:
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सिंगापूरमधील चांगी या विमानतळावर अचानक एक माकड पोहोचते. बऱ्याचदा अशा ठिकाणी माकडांना पाहिल्यावर लोक त्यांना रागानं हाकलण्याचा प्रयत्न करतात. पण, या व्हिडीओतील महिला माकडाला शांतपणे बाहेर जाण्यासाठी सांगते. अशा परिस्थितीत जिथे अनेक जण स्वतःचा संयम विसरतात, तिथे या महिलेने दाखविलेल्या शांत अन् संयमी स्वभावाचे अनेक जण कौतुक करीत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mothershipsg या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला दशलक्षामध्ये व्ह्युज मिळाले आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एकानं लिहिलंय, “प्राणी असो की मानव, सौजन्य महत्त्वाचे आहे.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, संकेत समजण्यास माकडं पुरेशी हुशार आहेत?” तर, अनेक युजर्स त्या महिलेचे कौतुक करतानाही दिसत आहेत.
वर दिलेल्या गूगल ट्रेंड्सच्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, अठ्ठेचाळीस तासांमध्ये ५०० हून अधिक युजर्सनी मंकी (माकड) हा कीवर्ड सर्च केला आहे.