मध्य प्रदेशात शनिवारी सकाळी उज्जैन रेल्वे स्थानकावर एका महिलेने आपल्या २ मुलांसह चालत्या ट्रेनमधून उडी घेतली. यावेळी ही महिला चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकली असताना स्थानकावरील एका रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) कॉन्स्टेबलने तिचा जीव वाचवला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या घटनेच्या व्हिडीओमध्ये ही महिला तिच्या दोन मुलांना प्लॅटफॉर्मवर फेकताना आणि नंतर स्वतः चालत्या ट्रेनमधून उडी मारताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की ट्रेनमधून उडी मारताना या महिलेचा डब्याच्या दरवाज्याजवळ तोल गेला आणि ती चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील भागात अडकली. यावेळी तिचा जीव जाण्याचा धोका होता. परंतु तिथे उपस्थित असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबल मुकेश कुशवाह यांनी वेळीच महिलेला बाहेर खेचले. मुकेश कुशवाह यांच्या या धाडसाचे लोक कौतुक करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, कॉन्स्टेबल मुकेश कुशवाह यांना त्यांच्या तत्पर कारवाईसाठी बक्षीस दिले जाईल.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं बाळाला दिला होता जन्म; घटना वाचून थक्क व्हाल

जीआरपीच्या पोलिस अधीक्षक निवेदिता गुप्ता म्हणाल्या, ‘मी तात्काळ कॉन्स्टेबलला पाचशे रुपयांचे बक्षीस दिले आहे. मी जीआरपी इन्स्पेक्टर राधेश्याम महाजन यांना मुकेश कुशवाह यांना बक्षीस देण्यासाठी शिफारस पत्र लिहिण्यास सांगितले आहे.’ इन्स्पेक्टर राधेश्याम महाजन म्हणाले, ‘एक व्यक्ती, त्याची पत्नी आणि दोन मुले सकाळी साडेसहा वाजता सिहोरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसण्यासाठी स्टेशनवर आले होते. ही महिला चुकून जयपूर-नागपूर ट्रेनमध्ये चढली. तिने आपल्या चार आणि सहा वर्षांच्या मुलाला प्लॅटफॉर्मवर फेकून दिले आणि नंतर स्वतः चालत्या ट्रेनमधून उडी मारली.’