Maid Daughter Eating On floor Viral Video : अनेकदा आहारतज्ज्ञ, पोषणतज्ज्ञ किंवा डॉक्टर दिनचर्येतील काही गोष्टी लक्षात ठेवून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काही उपयोगी टिप्स सांगणारे व्हिडीओ शेअर करतात. हे व्हिडीओ उपयुक्त वाटले तर ते मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. पण, आज एका पोषणतज्ज्ञांच्या बाबतीत उलटच घडलं.

बंगळुरू येथील पोषणतज्ज्ञ सोनाक्षी शर्मा यांनी पालकत्वाबद्दल माहिती किंवा टिप्स देणारा एक व्हिडीओ शेअर केला. बाळाला दूध पाजणे (BLW) ही केवळ फॅशन नाही तर भारतीय पालकत्वाच्या परंपरांमध्ये खोलवर रुजलेली आहे हे दाखविण्यासाठी हा व्हिडीओ बनवण्यात आला होता. पण, हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि तो वादाच्या भोवऱ्यात सापडला. कारण युजर्सना या व्हिडीओत एक वेगळाच फरक जाणवला.

व्हायरल व्हिडीओत पोषणतज्ज्ञ सोनाक्षी शर्मा आरामात सोफ्यावर बसलेली दिसत आहे. तर तर तिची लेक खुर्चीवर बसून जेवत आहे. नंतरच्या फ्रेममध्ये एका घरकाम करणाऱ्या महिलेचे ३ ते ४ वर्षांची मुलगी जमिनीवर बसून जेवत असल्याचे दाखवण्यात आले आहे. सोनाक्षीची लेक खुर्चीवर आणि घरकाम करणाऱ्या महिलेची लेक जमिनीवर हा फरक नेटकऱ्यांना आवडला नाही आणि व्हिडीओच्या कमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली.

व्हिडीओ नक्की बघा…

एक मूल खुर्चीवर तर दुसरे मुलं जमिनीवर (Viral Video)

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये पोषणतज्ज्ञ सोनाक्षी शर्माने सांगितले की, “तिची आई घरकामात इतकी व्यस्त असायची की, त्या तिच्या पुढ्यात जेवणाचे ताट वाढून ठेवायच्या आणि या प्रक्रियेमुळे सोनाक्षी स्वतःच्या हाताने जेवायला शिकली.” पण, अनेक युजर्ससाठी हा मुद्दा पालकत्वाच्या पद्धतींबद्दल नव्हताच. एक मूल खुर्चीवर तर दुसरे मूल जमिनीवर होते, यावर युजर्सनी अनेक प्रश्न उपस्थित केले.

कॅप्शनमध्ये लिहिलेली पालकत्वाबद्दल माहिती वाचणे बाजूलाच राहिले आणि युजर्स “जमिनीवर बसलेल्या मुलीकडे बघून माझे हृदय तुटले. त्यांना गरिबीमुळे त्यांची जागा दाखवली जाते. मी तर या गोष्टीची काळजी घेईन की, माझ्या मोलकरणीचे मूल जेवणाच्या टेबलावरच बसूनच जेवणाचे सेवन करेल. कारण हे खूप अपमानास्पद आहे”, “तुमच्या मोलकरणीची ३ वर्षांची मुलगो जमिनीवर जेवायला का बसली आहे. यामागे कोणतेही कारण असो. पण, हे फुटेज चुकीचा संदेश देत आहेत. ही तुलनात्मक रील अनावश्यक होती”; आदी कमेंट्स व्हिडीओखाली नेटकरी करू लागले आहेत.

तर या कमेंट्स बघून प्रतिक्रियांना तोंड देत पोषणतज्ज्ञ सोनाक्षी शर्माने स्पष्टीकरण दिले की, “दोन्ही क्लिप्स वेगवेगळ्या दिवशी शूट करण्यात आल्या होत्या आणि मोलकरणीच्या लेकीने जेवायला बसताना जमिनीवर बसणे पसंत केले. आम्ही फक्त या मुलीच्या पसंतीला महत्त्व दिले, तुम्ही हा व्हिडीओ चुकीच्या हेतूने पाहू नका.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या स्पष्टीकरणानंतर काहींनी तिच्या बचावात येऊन असा युक्तिवाद केला की, “संपूर्ण रीलचा मुद्दा समजून न घेता प्रत्येक जण जमिनीवर बसलेल्या मुलीकडे बोट दाखवत, अनावश्यक गोष्टींबद्दल कमेंटमध्ये रडत आहेत. इथेच समाज काय विचार करतो ते स्पष्ट होते आहे”; अशी एक कमेंट एका युजरने केली आहे, जी तुम्हालाही विचार करायला नक्कीच भाग पाडेल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @fitnaari.india या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो तुम्हीसुद्धा एकदा नक्की बघा…