Viral Video woman took her mother to Burj Khalifa : आपल्यातील अनेक जणांना प्रवास करायला भरपूर आवडते. नवनवीन ठिकाणे, शहर, देश फिरणे आणि तेथील ऐतिहासिक वा पर्यटनस्थळांना भेट देणे काही जणांचा छंद तर काही जणांची बकेट लिस्टमध्ये असते. फक्त आपणच नाही तर आई-वडिलांना आपल्या पैशांवर एखादा तरी परदेशात घेऊन जावं अशी कष्ट करणाऱ्या लेकरांची अपेक्षा असते. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये लेक आईला बुर्ज खलिफा दाखवायला घेऊन गेली आहे.

बिनिता कार्की असे लेकीचे नाव असून ती आपल्या आईला बुर्ज खलिफा (जगातील सर्वात उंच इमारत) दाखवण्यासाठी दुबईला घेऊन गेली. आईने बुर्ज खलिफा बघायला जाताना भारतीय परंपरा जपत साडी नेसली होती. बुर्ज खलिफाच्या आसपासच्या परिसरात तिने फेरफटका मारला आणि नवीन शहराचा आनंद घेताना दिसली. छोटासा पण मनाला स्पर्श करणारा आई आणि लेकीचा हा क्षण पाहून अनेक लोक भावूक झाले. आईला आनंद देण्यासाठी केलेला हा प्रेमळ प्रयत्न लोकांना खूप आवडला.

आई आणि लेकीचा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

आपण यशस्वी झालो की, स्वतःसाठी आणि घरातील सदस्यांसाठी खूप काही करणार असे आपण मनाशी ठरवून मोकळे होतो. कारण यशस्वी होण्याच्या प्रवासात त्यांनीच आपल्याला सगळ्यात जास्त मदत केलेली असते. त्यामुळे स्वतःबरोबर त्यांच्यासाठी काही गोष्ट आपलं कर्तव्य असते. तुम्ही पहिले असेल की, लेकीने स्वतःच्या हिंमतीवर आपल्या आईला दुबईत नेले. तिकडे गेल्यावर आईच्या चेहऱ्यावरील समाधान, आनंदही लाखमोलाचे होते. एकदा बघाच व्हायरल होणारा हा व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @boldbinita या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “
“तू तिचा दिवस खास बनवलास. तुझ्या यशामुळे जगात सगळ्यात जास्त आनंद कोणाला होत असेल. तर ते म्हणजे तुझे आई-वडीलच”, “तू खूप गोड आहेस! आईसाठी मुलीच्या मनातून आलेली ही खूप सुंदर आणि प्रेमळ भावना आहे. खरंच कमाल केलीस, असंच पुढे जात राहा”, “आम्हाला तुझा अभिमान आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.