Viral Video: दोन व्यक्तींमध्ये भांडण सुरू झाल्यावर जमणाऱ्या बघ्यांची संख्या काही कमी नसते. अशी भांडणं सोडवायला पुढे जाण्याऐवजी ती पाहण्यातच अनेकांना स्वारस्य असते. रस्त्यावर, ट्रेनमध्ये किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेली भांडणं काही लोक वेळात वेळ काढून बघतात. त्याशिवाय काही जण भांडणाचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअरही करतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर नेहमीच विविध विषयांवरील आधारित व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात; तर काही व्हिडीओंमुळे आपला थरकाप उडतो. सध्या सोशल मीडियावर एका ट्रेनमधील महिला आणि पुरुषांमधील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ट्रेनच्या डब्यामध्ये प्रवाशांची खूप गर्दी झाली असून, अशा गर्दीतून सर्व जण प्रवास करीत आहेत. यावेळी एक महिला आणि पुरुष यांच्यामध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण सुरू होतं. या भांडणात महिला खाली बसलेल्या पुरुषाला लाथा मारायला सुरुवात करते. त्यानंतर पुरुषही रागात उभा राहून महिलेला सटासट पाच-सहा कानफटात वाजवतो. त्यांचे हे भांडण पाहून आसपास उभे असलेले लोकही त्यांना अजिबात अडवत नाहीत. उलट सर्व जण सुरू असलेले भांडण पाहून गालातल्या गालात हसत मजा लुटत असल्याचे दिसतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @drx.__100 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर तीन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण यावर कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

एकाने लिहिलेय, “बरं झालं त्या बाईला असंच पाहिजे”. दुसऱ्या युजरने लिहिलेय, “बाकीचे लोक मजा घेत आहेत”. तिसऱ्या युजरने लिहिलेय, “नक्की कारण काय होतं भांडणाचं”.