Women Dance Video Viral : डान्स हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून आयुष्य आनंदाने जगायला शिकवणारी एक सुंदर कला आहे. नृत्यासाठी शारीरिक क्षमता, ऊर्जा आणि लय यांची गरज असते. मनसोक्त नाचल्याने मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते, आत्मविश्वास वाढतो, दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनतो आणि तणावही नकळत दूर होतो. म्हणूनच प्रोफेशनल नृत्य असो किंवा हळद, गणेशोत्सव, लग्नसमारंभ यांसारख्या उत्सवांतील डान्स, प्रत्येकालाच मनमोकळेपणाने नाचायला आवडते. तर सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
कोणी बघेल किंवा कोणी काय म्हणेल याची पर्वा न करता कार्यक्रमादरम्यान एक महिला अगदी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूची मंडळी देखील तिच्याकडे आनंदाने बघत, तिच्या स्टेप्सची हूबेहूब नक्कल करत, तिचा उत्साह वाढवत तिच्या बरोबर अगदी मनोसोक्त डान्स करताना दिसत आहेत. ‘वो बुलाती है मगर जाने का नही’ या गाण्यावर सगळे जण डान्स करत असले तरीही महिलेच्या स्टेप्सने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे असे म्हणायला हरकत नाही.
‘बाई हीच बाईची शत्रू’ असे अनेकदा म्हटले जाते. मात्र, हा व्हिडीओ त्या समजुतीला दूर करणारा आहे. येथे एकत्र आलेल्या महिला एकमेकींना मनापासून प्रोत्साहन देताना दिसतात. कोण काय म्हणेल याची पर्वा न करता स्वतःचा आनंद जपा, मनसोक्त नाचा आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण उत्साहाने जगा, असा सुंदर संदेश हा व्हिडीओ नकळत देऊन जातो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा महिलेचा डान्स व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…
https://www.instagram.com/ekadanta_pro_audio/reel/Dah6tNWxjCT
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ekadanta_pro_audio या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘क्रेझी डान्स’ अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. महिलेचा डान्स पाहून “ताई लय भारी डान्स बॉलीवूड डान्स केलात”, “वहिनींनी तर हवा केली”, “काकू चा जोश…”, “काकूचा डान्स तर खूपच भारी राव”, “आनंदाला वय लागत नाही”, “मावशीने तर आग लावून टाकली”, “ताई मस्त हो डान्स” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली कमेंट सेक्शनमध्ये करताना दिसून आले आहेत.
