viral video women dance on choli ke peeche kya hai song : अनेक महिला समाजाच्या अपेक्षांमुळे कायम लाजून, मान खाली घालून आणि स्वतःच्या भावना दाबून जगत असतात. जणू काही त्यांच्यावर नकळत एक नाजूकपणाचं ओझं टाकलं गेलं आहे. पण, जेव्हा कुटुंब, मित्र-मैत्रीण आणि जोडीदार यांची साथ मिळते, तेव्हा तीच महिला मनमोकळेपणाने जगू शकते. तिला आवडेल तसं हसू शकते, नाचू शकते, स्वतःचं मत मांडू शकते आणि स्वतःच्या आनंदाने आयुष्य जगू शकते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

@rajni_wow18 इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओत काही स्त्रिया मिळून एका महिलेला डान्स करण्यासाठी आग्रह करताना दिसतात. ती महिला सुंदर डान्स करते याबद्दल सगळ्यांनाच कल्पना असते. म्हणून सगळेच तिचा डान्स बघण्यासाठी उत्सुक असतात. मग सगळ्यांच्या आग्रहाखातर अखेर महिला डान्स करण्यासाठी तयार होते. १९९३ साली प्रदर्शित झालेला ‘खलनायक’ या चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ गाणं बॅकग्राऊंडमध्ये वाजते आणि मग एकच जल्लोष सगळ्यांमध्ये दिसून येतो.

…तीच शेवटी सगळ्यात भन्नाट डान्स करते (Viral Video)

डान्स सुरू करण्याआधी महिला डोक्यावर पदर घेते आणि मग आत्मविश्वासाने सुंदर डान्स सादर करते. गाण्यातील स्टेप्स तिने अगदी हुबेहूब सादर केल्या नसल्या तरीही तिच्या वेगळ्या आणि मनमोहक डान्स स्टाइलने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. मर्यादा आणि संस्कार जपतही आनंदाने, मनमोकळेपणाने कसं नाचता येतं, याचं सुंदर उदाहरण हा व्हायरल व्हिडीओ आहे. एकदा बघाच ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर महिलेचा जबरदस्त डान्स…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @rajni_wow18 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून महिलेच्या लेकीने “माझी सुंदर आई नेहमी उत्साही असते. ती फक्त नृत्यातच नाही तर प्रत्येक गोष्टीत अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. माझे बाबा नेहमी तिच्या पाठीशी उभे राहिले आणि तिला प्रोत्साहन दिलं. ती खूप आनंदी आणि मनमिळावू स्वभावाची महिला आहे”, “साधारणपणे जी काकू “नको नको, मला डान्स येत नाही” असं म्हणते, तीच शेवटी सगळ्यात भन्नाट डान्स करते”, “ती हे दाखवून देते की, अश्लीलपणा न करता सुद्धा सुंदर आणि मनमोकळा डान्स करता येतो. खूप छान” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…