women dance on Muqabla song : डान्स म्हंटल की, बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध चेहरे लगेचच आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यातील एक प्रभू देव, यांना भारताचा मायकल जॅकसन म्हटले जाते. डान्सर बरोबर एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशी बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये त्यांची ओळख आहे. त्यांच्यासारख्या स्टेप्स प्रत्येकालाच करणे जमेलच असे नाही. पण, ओडिशामधील मोती बेहरा हिने नेमके तेच करून दाखवले आहे. ‘मुकाबला’ गाण्यावर तिने सादर केलेला जबरदस्त डान्स सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरला आहे.

‘मुकाबला’ या प्रसिद्ध गाण्यावर एका महिलेने सादर केलेल्या डान्सने इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे. त्या महिलेने साधी कुर्ती आणि जीन्स परिधान करून अप्रतिम नृत्य सादर केले आहे. तिचा हा डान्स दाखवून देतो की, उत्कृष्ट सादरीकरणासाठी महागडे कपडे किंवा झगमगाटाची गरज नसते. आत्मविश्वास, कौशल्य आणि प्रतिभा असेल, तर साध्या पेहरावातही प्रेक्षकांची मने जिंकता येतात. डान्सदरम्यान तिचे हावभाव, पायांची हालचाल आणि स्टेप्स पाहून अनेक प्रेक्षकांना असे वाटले की, ती दिग्गज डान्सर प्रभू देवा यांनाही तगडी टक्कर देऊ शकते असे अनेकांना वाटते आहे.

या इन्स्टाग्राम रीलला आतापर्यंत १९ लाखांहून अधिक (१.९ दशलक्ष) व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच तिची ऊर्जा, अचूक हालचाली आणि स्टेप्स यांचे कौतुक करण्यासाठी नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला केलेला दिसतो आहे. महिलेच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार, बेहरा या शिक्षिका आणि आई आहेत. कुटुंब आणि नोकरीची जबाबदारी सांभाळूनही नृत्याची आवड जोपासून त्यांच्या सोशल मीडियावर नियमितपणे आपल्या डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @beatpefeet_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. महिलेचा डान्स पाहून “जुने खेळाडू पुन्हा मैदानात उतरले आहे”, “वय काहीही असो! खरी नृत्यकला आणि कौशल्य कायम टिकून राहते”, “खूप मस्त”, “”तुमच्यात आजच्या संपूर्ण पिढीपेक्षाही जास्त धाडस आहे”, “असा उत्साह आणि जिद्द आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यभर कायम ठेवावी. खरंच अप्रतिम!” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.