viral video women dance on Tainu shararat sikhawan song : घर सांभाळणारी, लाजून, मान खाली घालून, डोक्यावर पदर घेऊन शांतपणे हसत राहणारी स्त्री अशीच तिची ओळख अनेक वर्षे समाजाने रंगवली. मात्र काळ बदलला आणि स्त्रियांची भूमिकाही. अलीकडे घर संभाळण्याबरोबरच स्त्रिया त्यांची आवडही जपू लागल्या आहेत. नोकरी, व्यवसाय, इन्फ्लुएन्सिंग किंवा अगदी स्वयंपाकाचे व्हिडीओ बनवणे असो, प्रत्येक क्षेत्रात महिला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे येताना दिसत आहेत. अलीकडे व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओमधून बिनधास्त बेभान नाचणारी महिला सगळयांना थक्क करत आहे.
‘धुरंधर’ची सगळी गाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पण, चित्रपटातील ‘शरारत’ गाण्याची क्रेझ काही वेगळीच आहे. या गाण्यामध्ये आयशा खान व क्रिस्टल डिसूझाने हटके परफॉर्ममन्स केला आहे. पण, व्हायरल व्हिडीओतील या महिलेने अभिनेत्रीला तोडीस तोड देणारा डान्स केला आहे. महिलेने चक्क साडी नेसून, डोक्यावर पदर घेऊन डान्स केला आहे की, तुमची तिच्या प्रत्येक स्टेपवरून नजर हटणार नाही. तिचे हावभाव, तिच्या स्टेप्स सगळ्या इतक्या परफेक्ट आहेत की, तिच्या बाजूला डान्स बघणारेही थिरकताना दिसत आहेत.
दररोज सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात डान्स व्हिडीओंची संख्या विशेषतः जास्त असते. कधी मेट्रोत, कधी रस्त्यावर तर कधी सार्वजनिक ठिकाणी केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक जण वेगवेगळे व्हिडीओ तयार करताना दिसतात. मात्र, व्हायरल व्हिडीओतील या महिलेसारखे खरे आणि नैसर्गिक टॅलेंट क्वचितच पाहायला मिळते. अनेकदा असे कौशल्य चार भिंतींच्या आडच दडून राहते; पण कधीतरी एखाद्या व्हायरल व्हिडीओमुळे ते जगासमोर येते. एकदा बघाच महिलेचा जबरदस्त डान्स…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @deepali_sarasया इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून
“ताई, मी तुम्हाला फक्त एकच लाईक देऊ शकते, याचंच मला खूप वाईट वाटतंय. माझ्या हातात असतं तर मी तुम्हाला लाखो लाईक्स दिले असते”, “”किती सुंदर आणि देखणा सादरीकरण! तुम्ही दाखवून दिलं की लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी खऱ्या टॅलेंटची गरज असते. छोटे कपडे, मेकअप किंवा वेगळी हेअरस्टाईल नसली तरी चालते. तुमच्या कलेनेच सगळ्यांची मनं जिंकली. खूप छान, ताई!” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
