Viral Video: खेड्यातील अनेक महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतं. यापलीकडे जाऊन त्यांना स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी फार कमी मिळतो. पण, त्यातूनही हल्ली सोशल मीडियामुळे अनेक हौशी महिला आपल्यातील कला न घाबरता सादर करू लागल्या आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय. ज्यात ती चक्क तिच्या कामाच्या ठिकाणी काम करता करता आपल्या डान्सची हौस पूर्ण करताना दिसतेय.

भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. या भाषांमधील गाणीही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. अल्बम साँग असो किंवा चित्रपटातील गाणी असो, ही एकदा चर्चेत आली की सोशल मीडियावरही अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल.

सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये घराचे बांधकाम करणारी कामगार महिला तिच्या कामाच्या ठिकाणी काम करता करता सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या “सावन में मोरनी बनके” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्या महिलेच्या डोक्यावर काही विटा देखील आहेत. डोक्यावर या विटा घेऊन ती अतिशय आत्मविश्वासाने नाचतेय, यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेपही खूप सुरेख आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Sabitri Yadav (@sabitri95284)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sabitri95284 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत मिलियन्सहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “या गाण्यावरील सर्वात सुंदर व्हिडीओ.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “श्रृंगार करणाऱ्या महिलेपेक्षा संघर्ष करणारी महिला अधिक सुंदर दिसते.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “किती छान काकू” आणखी एकाने लिहिलेय,, “खरा कलाकार जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकलेला असतो.”