scorecardresearch

Viral: महिला पत्रकाराने रिपोर्टींग करताना माईकवर कंडोम लावला अन.. भर पावसातला ‘तो’ फोटो चर्चेत

Florida Hurricane: कायलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर काहीच वेळात तुफान व्हायरल झाला, अनेकांनी सुरुवातीला माईकवर नक्की काय लावले आहे हे ओळखलेच नाही

Viral: महिला पत्रकाराने रिपोर्टींग करताना माईकवर कंडोम लावला अन.. भर पावसातला ‘तो’ फोटो चर्चेत
Women Journalist Puts condom on mike while reporting Florida hurricane (फोटो: ट्विटर)

Reporter Puts Condom On Mike: मध्य फ्लोरिडात आलेल्या तुफानी वादळामुळे मागील काही दिवसात जोरदार पाऊस झाला आहे. वादळामुळे आतापर्यंत ७० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर ४००० हून अधिक व्यक्तींना जीव वाचवण्यासाठी स्थलांतरित करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी वीज सेवा ठप्प झाल्याने सर्वच कामे अडकून पडली आहेत. मात्र काहीही झालं तरी मीडियाला ब्रेक घेता येत नाही, त्यामुळे या वादळातही पत्रकार मंडळी रस्त्यावर उतरून थेट प्रक्षेपण करत आहेत. अशाच एका महिला पत्रकाराचा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

तर झालं असं की, काही दिवसांपूर्वी NBC2 या वाहिनीसाठी रिपोर्टींग करणारी पत्रकार कायला गेलर फ्लोरिडामध्ये सुरु असलेल्या बचाव कार्याविषयी माहिती देत होती. यावेळी अचानक तिच्या अवतीभोवती वादळाचा घोंगावता आवाज वाढू लागला. शूट करताना या आवाजाचा अढथळा येऊ लागल्याने शेवटी कायला हिने आपल्याजवळील बूम माईकला चक्क एक कंडोम घातला. आश्चर्याची बाब अशी की यामुळे खरोखरच अतिरिक्त आवाज कमी होऊन मग कायलाला माहिती देणे सहज झाले.

कायलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर काहीच वेळात तुफान व्हायरल झाला, अनेकांनी सुरुवातीला माईकवर नक्की काय लावले आहे हे ओळखलेच नाही आणि त्यावरून विचारणा केली. अखेरीस कायलाने स्वतः एक व्हिडीओ पोस्ट करून याविषयी माहिती दिली. अनेकांनी मला माईकवर काय लावले आहे असा प्रश्न केला. आम्हाला माईकची काळजी घेणे गरजेचे आहे, त्याला भिजू देऊ शकत नाही त्यामुळे मी माईकवर कंडोम लावला असल्याचे कायला यांनी सांगितले.

माईकवर चढवला कंडोम

कायलाच्या या व्हिडिओवरही अनेकांनी कमेंट करून या भन्नाट कल्पनेचे कौतुक केले आहे. वादळाच्या आवाजाचा व पावसाचा अडथळा होत असल्याने तिने लढवलेली शक्कल पाहून या गंभीर परिस्थितीत अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या