Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एका हळदीतील सुंदर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला अतिशय सुंदर डान्स करताना दिसतेय.

समाजमाध्यमांवर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात कधी समारंभाचे व्हिडीओ, लग्नाचे व्हिडीओ तर कधी नृत्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु यातील काही मोजकेच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आलाय. ज्यात एक महिला खूप लावणी करताना दिसतेय.

लावणी नृत्य ही महाराष्ट्राची लोककला आहे. गावाच्या जत्रेतून पिढ्यापिढ्या मनोरंजन करणारी लावणी आजही लोकांच्या पंसतीस उतरते. लावणी ही वाटते तितके सोपे नाही. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच त्याचबरोबर नृत्य करण्यासाठी अदाही लागते. ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण मोजकेच व्हिडिओ असतात जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आताही असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हळदीच्या कार्यक्रमामध्ये काही महिला डान्स करत असून यावेळी या महिलांमधील एकाच महिलेच्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ही महिला ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ या गाण्यावर सुंदर लावणी सादर करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mehandi_mulla_official या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक जण कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “खूपच सुंदर नाचलात ताई”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “आई गं किती छान डान्स केलास”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “याला बोलतात खूप भारी डान्स”