Viral video: एखादं नवीन गाणं असो किंवा चित्रपटातील नवीन डायलॉग्ज हे सर्व सोशल मीडियावर चर्चेत आलं की, त्यावर लाखो लोक रील्स बनवतात. काही दिवसांपूर्वी आलेला चित्रपट‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटातील गाणं ‘स्वर्गात आकाशगंगा’ हे खूप व्हायरल होत असून सर्वांच्याच पसंतीस उतरले आहे.

महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला वेळ काढून आवडीच्या गाण्यावर एखादी रील बनविताना दिसतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच काही महिला आहेत; ज्या किसीक या गाण्यावर रील डान्स करीत आहेत.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलांनी साडी नेसली असून, “स्वर्गात आकाशगंगा” या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करीत आहेत. यावेळी त्या एकदम साध्या, सोप्या आणि सुंदर पद्धतीनं डान्स करीत आहेत. त्यांच्या साधेपणाचं सोशल मीडियावर युजर्स खूप कौतुक करीत आहेत.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ इन्टाग्रामवरील bhushan.p_2000 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास लाखाहून अधिक व्ह्युज आणि ४६ हजाराहून अधिक लोकांच्या लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूपच भारी सगळ्या अगदी मस्त करत आहात” तर एका युजरने लिहिलेय, “किती छान, गाणे..ग्रुप..डान्स… एकी आहे. जबरदस्त महाराष्ट्रीयन संस्कृती जपून एवढे सुंदर नृत्य करत आहेत. हॅट्स ऑफ यूपुन्हा पुन्हा पहावासा वाटणारा व्हिडिओ.” आणखी एका युजरने लिहिलेय, “संसाराची जबाबदारी सांभाळून महिला असा आनंद जेव्हा लुटतात तेव्हा यांना कोणी अडवू नये असे वाटतं” एक युजर लिहितो, “मराठी नारी कुठेच मागे नाही. किती पाहिले तरी मन भरत नाहीये. सगळ्या खूप गोड दिसत आहेत.” तर एक युजर लिहितो, “नाद पाहिजे फक्त” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.