Viral Video: महाराष्ट्रात मराठी भाषेसोबतच विविध बोलीभाषांची समृद्ध परंपरा आहे. प्रत्येक प्रदेशातील बोली, उच्चार, शब्दांची ठेवण आणि बोलण्याची लय वेगळी असल्यामुळे त्या त्या भागातील लोककला आणि गाण्यांमध्येही या भाषिक वैविध्याची सुंदर झलक पाहायला मिळते. कोकणी, मालवणी, वऱ्हाडी, झाडीबोली, अहिराणी, खानदेशी, आगरी, तसंच ग्रामीण भागातील विविध स्थानिक बोलींमधील गाणी आजही लोकांच्या विशेष पसंतीस उतरतात.

या गाण्यांमध्ये त्या भागातील संस्कृती, परंपरा, सण-उत्सव, नातेसंबंध, प्रेम, विनोद, शेती आणि दैनंदिन जीवनाचे चित्रण आढळते. पूर्वी ही गाणी प्रामुख्याने जत्रा, लग्नसमारंभ, सण, लोकनाट्य, भारूड, पोवाडे आणि पारंपरिक कार्यक्रमांमधून ऐकायला मिळायची; मात्र सोशल मीडियामुळे आता स्थानिक बोलीभाषेतील गाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापासून देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. एखाद्या बोलीतील एखादे गाणे किंवा त्यावरचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या बोलीची शब्दशैली आणि संस्कृतीबद्दलही अनेकांना उत्सुकता निर्माण होते. त्यामुळे सोशल मीडिया हा केवळ मनोरंजनाचा माध्यम न राहता महाराष्ट्रातील भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे.

लोकगीतांतील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ‘कोळीगीते’. त्यात मुंबई आणि कोळीगीते हे समीकरण अगदी अनोखेच आहे. वाढदिवस, वरात, लग्न असो किंवा अगदी गणपती मिरवणूक असो कोळीगीत लावल्याशिवाय कार्यक्रम पूर्णच होत नाही. कारण या गाण्यांवर नाचण्याची मजा काही वेगळीच असते. ‘एकवीरा आई गो एकवीरा आई’, ‘हिंगालय देवी’, ‘तो तो विमान’ ‘रसिकाच्या लग्नात’ या गाण्यांनी तर अक्षरशः लोकांच्या मनात घरच केलं आहे. तर या गाण्यांव्यतिरिक्त आणखी एक कोळी गीत असं आहे, जे आजही सतत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

समाजमाध्यमांवर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण विविध गाण्यांवर डान्स करून आपली कला सादर करतात. हल्ली सोशल मीडियावर कोळी गीतदेखील खूप चर्चेत येऊ लागली आहेत. सध्या अशाच एका कोळीगातावरील एक डान्स खूप व्हायरल होतोय. यामध्ये एक तरूणी सुंदर डान्स करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चार महिला समुद्र किनारी सुंदर पारंपारिक वेश करून ‘वेसावची पारू’ या कोळी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्सही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by BHUMI GOSAR (@_bhumi_gosar_)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @bhumi_gosar या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “अहा, काय नाचल्या” आणखी एकाने लिहिलेय, “मस्तच गं” आणखी एकाने लिहिलेय, “एक नंबर केला यांनी”