Viral Video: समाजमाध्यमांवर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज हजारो युजर्स विविध विषयांवरील आधारित व्हिडीओ पोस्ट करतात. परंतु, यातील सर्व व्हिडीओंमधील केवळ काही हटके, विचित्र व्हिडीओच मोठ्या प्रमाणात चर्चेत येतात. दरम्यान, सध्या एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी हेल्थ एक्सपर्ट्स नेहमी योगा करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे अनेक महिला, पुरुष मंडळी सकाळी योगा, मॉर्निंक वॉक करण्यासाठी जातात. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, ज्यात कधी काही पुरुष वॉक करताना दिसतात तर काही महिला योगा करताना दिसतात. सध्या अशाच काही महिलांचा एक व्हिडीओ पाहायला मिळतोय, ज्यातील महिला असं काहीतरी करत आहेत जे पाहून तुम्हीही कपाळावर हात माराल.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही महिला योगा करण्यासाठी सकाळी एके ठिकाणी जमल्या होत्या. यावेळी सर्व महिला आपापल्या योगा मॅटवर उभ्या असून त्यांच्या समोर एक महिला उभी आहे, जी त्यांना योगा करायला शिकवत आहे. समोर उभी असलेली महिला आपले दोन्ही हात हवेत उंचावून, जीभ बाहेर काढून, डोळे पूर्णपणे उघडून योगासन करत आहे. अशाप्रकारचा योगा क्वचित कोणी पाहिला असेल. यावेळी सर्व महिलादेखील या प्रकारचा योगा करू लागतात. ज्यांना हे योगासन ठाऊक आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट नॉर्मल आहे. पण, ज्यांना हे योगासन ठाऊक नाही ते लोक नक्कीच घाबरतील.
हा व्हिडीओ X(ट्विटर) वरील @BapuDaLadla या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण यावर कमेंट्स करतानाही दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “खूपच फनी व्हिडीओ, एन्जॉय करा.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “हा कुठला योगा आहे, कधीही न पाहिलेला.” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “मार्केटमध्ये नवीन योगा आला आहे”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “हा..हा.. खूपच मजेशीर आहे.”