जगात नावलौकिक मिळवण्यासाठी लोकं काय काय करत असतात. मग उद्योग, क्रीडा, गायन यासारख्या विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करून नाव प्रस्थापित केलं जातं. मात्र या पलीकडे काही व्यक्ती अनोखी कामगिरी करून लक्ष वेधून घेतात. असाच विक्रम प्रस्थापित केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्यक्तीच्या कामगिरीची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकने घेतली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्यक्ती उलट्या हातावर एकापेक्षा जास्त अंडी ठेवताना दिसत आहे.

व्हिडिओत असलेल्या व्यक्तीजवळ एक अंड्याचा ट्रे आहे. पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला व्यक्ती एक एक करत उलट्या हातावर अंडी ठेवत आहे. जबरदस्त ट्रिक वापरत त्याने उलट्या हातावर १८ अंडी ठेवली. या व्यक्तीचं नाव इब्राहिम सादिक असून तो इराकमधला असल्याचं व्हायरल पोस्टवर लिहीलं आहे. या व्हिडिओला तीन हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं की उलट्या हातावर अंडी ठेवणं सोपं असतं. मात्र जसजसा व्हिडिओ पुढे सरकतो तसं समजतं की हे वाटतं तितकं सोपं नाही. त्याची ट्रिक पाहून लोकंही हैराण झाली आहेत.