Viral Video : कुस्तीपटूने ‘द ग्रेट खली’ सोबत घेतला पंगा; त्यानंतर जे घडले, ते तो कधीही विसरणार नाही

सध्या द ग्रेट खली उर्फ ​​दलीप सिंग राणा यांनी एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते एका कुस्तीपटूला धडा शिकवताना दिसत आहेत.

the great khali viral video
या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. (Photo : Instagram/@thegreatkhali)

प्रसिद्ध कुस्तीपटू द ग्रेट खली उर्फ ​​दलीप सिंग राणा यांना सर्वच ओळखतात. डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये अनेक खेळाडूंना धूळ चारल्यानंतर ते जगभरात प्रसिद्ध झाले. सध्या ते रिंगमध्ये क्वचितच दिसतात, परंतु ते अनेक भारतीय कुस्तीपटूंना तयार करण्याचे काम करत आहेत. तसेच, ते सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. त्यांना विनोदी व्हिडीओ बनवायला फार आवडते. ते दररोज त्यांच्या सीडब्ल्यूई या रेसलिंग अकादमीशी संबंधित अनेक व्हिडीओ पोस्ट करत असतात. सध्या त्यांनी एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते एका कुस्तीपटूला धडा शिकवताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुस्तीपटू द ग्रेट खली उर्फ ​​दलीप सिंग राणा यांना कबड्डी खेळण्याचे आव्हान देत आहे. खलीला त्याच्या कृत्याचा राग येतो. तो खलीला पकडायला जाताच खली त्याचे डोके पकडतात. आपल्या अनोख्या चालीसाठी प्रसिद्ध असलेले खली कुस्तीपटूचे डोके फुटबॉलप्रमाणे दाबू लागतात. यानंतर पैलवान आरडाओरडा करत स्वतःची सुटका करून घेण्यासाठी धडपडू लागतो.

जुलैमध्ये जन्माला आलेले लोक असतात खूपच खास; मिळवतात अफाट यश आणि प्रसिद्धी

खलीने ज्या पद्धतीने त्या माणसाचे डोके धरले आहे ते पाहता ते या कुस्तीपटूला पूर्णपणे धडा शिकवण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत आहे. अखेर दोघांची ही झुंज सोडवण्यासाठी बाकीच्या पैलवानांनाही यावे लागले. खलीने त्यांच्या अकादमीतून असा व्हिडीओ शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ते असे करत आले आहेत. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video wrestler messed up with the great khali he will never forget what happened next pvp

Next Story
VIRAL VIDEO : भरधाव वेगात कार जात होती अन् रुग्णवाहिकेच्या समोरून घसरली, डिव्हायडरला धडकली
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी