Viral Video: स्वर्गासारखे हे सुंदर दृश्य पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल!

हे सौंदर्य पाहून असे वाटते की ते ठिकाण पृथ्वीवरच नाही तर स्वर्गाच आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २.५ लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे.

Beautiful Places video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @buitengebieden_ /Twitter )

भारताव्यतिरिक्त स्वित्झर्लंड, कॅनडा, इटली, ग्रीस आणि ब्राझील यांसारखे देश आहेत, जे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्य, नद्या, टेकड्या, ऐतिहासिक स्थळे आणि इतर पर्यटन स्थळांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. विशेषत: थंडीच्या सिजनमध्ये या देशांचे सौंदर्य नजरेसमोर येते, जेव्हा सगळीकडे फक्त बर्फाच्छादित मैदाने दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला एवढं सुंदर दृश्य पाहायला मिळतं की कोणीही मंत्रमुग्ध होऊन जातो.

मंत्रमुग्ध करणारे दृश्य

व्हिडीओमध्ये फक्त एक रस्ता काळा दिसत आहे, तर बाजूची सर्व झाडे पूर्णपणे बर्फाने झाकलेली आहेत आणि वरच्या निळ्या आकाशामुळे या दृश्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. हे सौंदर्य पाहून असे वाटते की ते ठिकाण पृथ्वीवरच नाही तर स्वर्गाच आहे. तथापि, बर्फाच्या ठिकाणी असे दृश्य सामान्य आहेत.

(हे ही वाचा: सिंहाने पाणी पीत असलेल्या हरणावर केला हल्ला आणि…;बघा व्हायरल व्हिडीओ)

कुठला आहे हा व्हिडीओ?

स्वर्गासारखे हे सुंदर दृश्य ग्रीसचे आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @buitengebieden_ या अकाउंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे आणि ‘ग्रीसमधील हिवाळी वंडरलँड’ असे कॅप्शन लिहिले आहे.

(हे ही वाचा: बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणून ‘नाचू’ लागली महिला; लाइव्ह टीव्ही डिबेट दरम्यानचा Video Viral)

(हे ही वाचा: Viral Video: थंडीपासून वाचण्यासाठीचा केलेला हा जुगाड पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही!)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

११ सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत २.५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर १३ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘रस्ता किती स्वच्छ आहे ते पाहून मी प्रभावित झालो आहे’, असे लिहिले. त्याचप्रमाणे इतर अनेक वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video you too will be mesmerized by this beautiful view like heaven ttg

Next Story
एका लग्नाची अनोखी कहाणी; गुगल मीटद्वारे सहभागी होणार पाहुणे, झोमॅटोद्वारे घरपोच जेवणाची डिलिव्हरी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी