Viral Video: मोबाइल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे हल्लीच्या लहान मुलांचं बालपण कुठेतरी हरवलं आहे. पूर्वीची मुलं त्यांच्या लहानपणी विविध खेळ खेळायचे, आवडीच्या गोष्टी करायचे, घरातील मोठ्यांकडून गाणी, गोष्टी ऐकायचे. पण, आताच्या लहान मुलांना या सर्व गोष्टींपेक्षा मोबाइल आणि सोशल मीडिया त्यावरील रील्स खूप महत्त्वाच्या आहेत. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन मुलं असं काहीतरी करताना दिसत आहेत, जे पाहिल्यावर अनेकांना बालपणी केलेली मजामस्ती आठवत आहे.

बालपण हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सुंदर काळ आहे. बालपणी केलेल्या अनेक गमतीजमती आपल्या आठवणीत घर करून राहतात. आपण जसजसे मोठे होतो तसं बालपणही आपल्यापासून दूरावतं. आपल्या बालपणी मोबाइल किंवा सोशल मीडिया यांचा वापर फार कमी आणि महत्त्वाच्या कामासाठीच केला जायचा. पण, आताच्या काळात प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतोच, शिवाय लहान मुलं त्रास देऊ नये म्हणून त्यांचे आई-बाबादेखील त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी मुलांच्या हातात फोन देतात. दरम्यान, आता एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक-दोन मुलांना पाहून अनेकांना त्यांच्या बालपणीची आठवण येत आहे.

Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
shocking video : parents should take care of their children.
VIDEO : पालकांनो, तुमची मुले करू शकतात अशा चुका! चिमुकला अडकला लिफ्टमध्ये; पाहा, पुढे काय घडले?
2G era video
‘विसरू नको रे आई-बापाला’; 2G च्या काळातील VIDEO पाहून नेटकऱ्यांना आठवलं बालपण
a son fulfilled parents dream Parents sat on a plane for the first time in their life
आयुष्यात पहिल्यांदा विमानात बसले आईवडील , लेकाने केले स्वप्न पूर्ण; VIDEO होतोय व्हायरल
Viral Video Shows Parents Love For Their Childrens
पालकांचे ऋण फेडणे कठीण…! हॉस्टेलला जाणाऱ्या लेकराची बॅग भरणारे आई-बाबा; VIRAL VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Viral Video Shows Childhood Friends
​लक्षात राहणारी मैत्री… ! २३ वर्षानंतर रिक्रिएट केला क्षण, VIRAL VIDEO पाहून तुम्हालाही आठवतील बालपणीचे ते दिवस
In addition to children parents should also be aware
मुलांव्यतिरिक्त पालकांनीही आपल्या स्क्रीन टाइमबद्दल जागरूक असायला हवं; त्यासाठी काय करायला हवं?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रस्त्यावर दोन लहान मुलं उभी असून यावेळी त्या दोघांमधील एक मुलगा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईकला हात लावतो, ज्यामुळे त्या बाईकमधून सायरनचा आवाज येतो. सायरनचा आवाज ऐकताच ते दोघेही त्यावर नाचायला सुरुवात करतात आणि मोठमोठ्याने हसतात. त्यानंतर आवाज बंद झाल्यामुळे ते पुन्हा गाडीला हात लावून सायरनवर नाचतात, पण इतक्यात बाईकचा मालक गाडीपाशी येत असल्याचे त्यांना दिसते आणि ते पळून जातात. सध्या या चिमुकल्यांचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shivsurya_ या अकाउंटवर शेअर केला असून यावर हजारो व्ह्यूज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण यावर कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

हेही वाचा: ‘आई कोणाचीही असो…’ गोठ्यात रडणाऱ्या चिमुकल्याबरोबर गाईनं काय केलं ते पाहाच; VIDEO व्हायरल

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओवर एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “हो ना, बालपण खूप सुंदर असतं.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “आमच्यावेळी अशा गाड्यापण नव्हत्या”, तर आणखी एकाने लिहिलं की, “खूप गोड मुलं आहेत

Story img Loader