Viral Video: सोशल मीडियावर दर दिवशी वेगवेगळे हटके व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे व्हिडीओ, तर कधी गाणी म्हणतानाचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी एखादी हटके ट्रिक व्हायरल होते, तर कधी एखादं गाणं चर्चेत येतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक तरुण एका बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसतोय.

हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण घरबसल्या पैसे कमवत आहेत. काही जण युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर अशा अनेक प्लॅटफॉर्मचा वापर त्यांचे टॅलेंट दाखवण्यासाठी करत आहेत आणि नावासोबत पैसेसुद्धा कमवताना दिसून येत आहेत. व्यापारी असो किंवा एखादा कलाकार, प्रत्येक जण आपल्या कौशल्याचा वापर करून नवनवीन व्हिडीओ पोस्ट करताना दिसून येतात; तर अशातच काही जण असेही असतात, जे परिस्थितीमुळे आपलं टॅलेंट लोकांपर्यंत पोहचवू शकत नाहीत किंवा सोशल मीडियाची मदत घेतात. ज्यामुळे लाखो कलाकारांच्या कलेला आता वाव मिळू लागला आहे.

आजकाल ज्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत, त्याचप्रमाणे महिलांचे वर्चस्व असलेल्या कला जसे की स्वयंपाक, मेकअप, हेअरस्टाईल, शिवणकाम, विविध डान्स प्रकार, मेहंदी काढणे, रांगोळी काढणे अशा अनेक कला पुरूषही आत्मसात करू लागले आहेत. अनेक पुरूष तर या क्षेत्रांमध्ये महिलांनाही मागे टाकू लावले आहेत. सध्य अशाच एका पुरूषाचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तो अतिशय सुंदर डान्स सादर करताना दिसतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या व्हिडीओतील एक तरूण बॉलिवूडमधील ‘तुमसा नही देखा’ या चित्रपटातील “मुझे तुमसे मोहब्बत है” या गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करताना दिसतोय. त्याचा हा सुंदर डान्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @manish_poonam या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्युज मिळाल्या असून त्यावर लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “सुपरहिट डान्स” आणखी एकाने लिहिलेय, “भावा फेमस होणार तू” आणखी एकाने लिहिलेय, “जबरदस्त डान्स केला भावा” तर आणखी एकाने लिहिलंय की, “एक नंबर डान्स”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “काय एनर्जी आहे तुझी”. तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूपच सुरेख, सुंदर”