Viral Video: हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण घरबसल्या पैसे कमवत आहेत. काही जण युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर अशा अनेक प्लॅटफॉर्मचा वापर त्यांचे टॅलेंट दाखवण्यासाठी करत आहेत आणि नावासोबत पैसेसुद्धा कमवताना दिसून येत आहेत. व्यापारी असो किंवा एखादा कलाकार, प्रत्येक जण आपल्या कौशल्याचा वापर करून नवनवीन व्हिडीओ पोस्ट करताना दिसून येतात; तर अशातच काही जण असेही असतात, जे परिस्थितीमुळे आपलं टॅलेंट लोकांपर्यंत पोहचवू शकत नाहीत किंवा सोशल मीडियाची मदत घेतात. ज्यामुळे लाखो कलाकारांच्या कलेला आता वाव मिळू लागला आहे.
समाज माध्यमांवर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. हल्ली सतत बॉलीवूडमधील नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका तरूणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ, फोटो रोज व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसविणारे, तर काही थक्क करणारे असतात. कधी मजेशीर, विचित्र, धोकादायक, स्टंटचे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या विश्वात कुठे काय घडेल आणि कधी व्हायरल होईल ते काही सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो एका लग्नाच्या वरातीमधील आहे.
हा व्हिडीओ एका लग्नाच्या वरातीमधील असून काहीजण रस्त्यावर नाचताना दिसत आहेत. यावेळी एका तरुणाच्या सुंदर नृत्याने आणि चेहऱ्यावरील हावाभावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो यावेळी “गोली चल जावेगी” या गाण्यावर नाचतोय. त्याचा हा डान्स सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ @pritamhasanpuri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्या व्हिडीओला आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय, “एकच नंबर भावा” एका युजरने लिहिलेय, “खतरनाक भाई” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती सुंदर”
