Viral Video: हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण घरबसल्या पैसे कमवत आहेत. काही जण युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर अशा अनेक प्लॅटफॉर्मचा वापर त्यांचे टॅलेंट दाखवण्यासाठी करत आहेत आणि नावासोबत पैसेसुद्धा कमवताना दिसून येत आहेत. व्यापारी असो किंवा एखादा कलाकार, प्रत्येक जण आपल्या कौशल्याचा वापर करून नवनवीन व्हिडीओ पोस्ट करताना दिसून येतात; तर अशातच काही जण असेही असतात, जे परिस्थितीमुळे आपलं टॅलेंट लोकांपर्यंत पोहचवू शकत नाहीत किंवा सोशल मीडियाची मदत घेतात. ज्यामुळे लाखो कलाकारांच्या कलेला आता वाव मिळू लागला आहे.
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ, फोटो रोज व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसविणारे, तर काही थक्क करणारे असतात. कधी मजेशीर, विचित्र, धोकादायक, स्टंटचे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या विश्वात कुठे काय घडेल आणि कधी व्हायरल होईल ते काही सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो एका ऑफिसमधील आहे.
ऑफिस म्हटलं की, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख, तणाव पाहायला मिळतो. परंतु हल्ली अनेक ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी व्हावा यासाठी दररोज काही वेळ किंवा आठवड्यातील एखाद्या वाराला मनोरंजन करण्यासाठी काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ज्यात खेळ खेळले जातात, गाणी म्हटली जातात किंवा डान्स केला जातो. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काही पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ऑफिसमध्ये सर्वांसमोर एक तरूण ‘जो बीच बजरिया’ या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. त्याच्या अफलातून डान्स स्टेप्स अन् त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून आसपास असलेले सर्वचजण अवाक् होतात. शिवाय या तरूणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
या व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ram_official_0119 या अकाउन्टवर शेअर केला असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्सही येत आहेत. एका युजरने लिहिले, “कसला नाचतोस रे” आणखी एकाने लिहिलेय की, “भावा तू तर भारीच”, तर आणखीने एकाने लिहिलंय की, “भाऊ राडा केलास तू तर”
